करंडकासह./ वृत्तसंस्था
सिनसिनॅटी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स वेस्टर्न आणि सदर्न खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत ल्युडमिला किचेनॉक आणि एलेना ओस्टापेंको यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळविताना निकोली मार्टिनेज आणि इलेन पेरेझ यांचा पराभव केला.
शनिवारी महिला दुहेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात किचेनॉक आणि ओस्टापेंको यांनी मार्टिनेज व पेरेझ यांचा 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला. हा अंतिम सामना 85 मिनिटे चालला होता. या अंतिम सामन्यामध्ये किचेनॉक आणि ओस्टापेंको यांनी दुसऱया सेटमधील शेवटचे सलग चार गेम्स जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.