मुंबई / वृत्तसंस्था
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात स्लो ओव्हर रेटबद्दल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न करवून घेतल्याची ही दुसरी वेळ असल्याने त्याला दुप्पट दंड करण्यात आला. लखनौच्या अंतिम एकादशमधील उर्वरित सर्व खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मानधनाच्या 25 टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल, तो दंड म्हणून भरण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आयपीएल कार्यकारिणीने सोमवारी या दंडात्मक कारवाईची घोषणा केली. लखनौ सुपर जायंट्स संघाने या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध 36 धावांनी सहज विजय संपादन केला होता, त्यात केएल राहुलची शतकी खेळी लक्षवेधी ठरली.