क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व विद्याभवन स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय तर ओरिएंटल स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी क्लस्टर प्राथमिक गटात मुलांमध्ये प्लेजेंट कॉन्व्हेंट संघाने, मुलींमध्ये बालिका आदर्श संघाने डीपी संघाचा 2-1, माध्यमिक गटात मुलांमध्ये केएलएस संघाने विद्याभवन संघाचा 2-0 तर मुलींमध्ये डीपी संघाने बालिका आदर्श संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
बालिका आदर्श विद्यालयाच्या टेबल टेनिस सभागृहात आयोजित टेबलटेनिस स्पर्धेत प्राथमिक गटात मुलींच्या अंतिम सामन्यात बालिका आदर्श संघाने डीपी संघाचा 2-1 तर मुलांच्या अंतिम सामन्यात प्लेजंट कॉन्व्हेंटने केएलएसला 2-1 असे हरवून विजेतेपद पटकाविले. माध्यमिक गटात मुलांच्या उपांत्य सामन्यात केएलएसने गोमटेश संघाचा 2-0 तर दुसऱया उपांत्य सामन्यात विद्याभवनने गोमटेश मराठी संघाचा 2-1 असा पराभव केला. अंतिम फेरीत केएलएसने विद्याभवनला 2-0 असे हरवून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या विभागात अंतिम सामन्यात डीपी संघाने बालिका आदर्श संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिल्व्हीया डिमेलो, उमेश मजुकर, संतोष दळवी, उमेश बेळगुंदकर, श्रीहरी लाड यांनी विशेष परिश्रम घेतले.