बेळगाव – के. एल.एस राजा लखमगौडा लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अरुणोदय इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज, बेंगळुर यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुर यांनी आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण कायदेशीर आणि क्लिनिक स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. कार्तिक तोलगट्टी, अनिल गिड्डागौडर, लक्ष्मी पुजारी, ऋचा अष्टपुत्रे, शुभांगी पाटील, मलिकार्जुन पुजारी, सुजीत कदम आणि शिवानंद बिज्जरगी या ८ विद्यार्थ्यांचा संघात समावेश होता. कर्नाटक लॉ सोसायटीचे अधिवक्ता आणि अध्यक्ष श्री अनंत मंडगी, अधिवक्ता आणि कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष श्री. पी. एस. सावकर, अधिवक्ता आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजा लखमगौडा लॉ कॉलेज, श्री. एम. आर. कुलकर्णी, प्राचार्य ए.एच. हवालदार, विधी सहाय्य विभागाचे समन्वयक, प्रा. चेतनकुमार. टी . एम आणि इतर कर्मचारी सदस्य आणि विद्यार्थ्यांनी यावेळी सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले

