Tarun Bharat

क्लुजनरचा फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा

वृत्तसंस्था/ हरारे

झिंबाब्वे क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लुजनर यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उंबरठय़ावर क्लुजनर यांनी आपला निर्णय झिंबाब्वे क्रिकेट संघाला कळविला.

झिंबाब्वे क्रिकेट मंडळ आणि लान्स क्लुजनर यांच्यात यापूर्वी औपचारिक करार झाला होता. क्लुजनरने स्वतःहून हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. भविष्यकाळात तो आता विविध देशाच्या राष्ट्रीय संघासाठी पूर्णवेळ प्रमुख प्रशिक्षकपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल.

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी झिंबाब्वे संघाला पात्रता मिळवून देण्यासाठी क्लुजनर यांचे योगदान आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले, अशी प्रतिक्रिया झिंबाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापक संचालक माकोनी यांनी व्यक्त केली. गेल्या मार्चमध्ये क्लुजनर यांनी फलंदाज प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. तसेच 2016 ते 2018 या कालावधीत क्लुजनर हे पहिल्यांदा झिंबाब्वे संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिंबाब्वेचा संघ ब गटात असून या गटामध्ये आयर्लंड, विंडीज, स्कॉटलंड यांचा समावेश आहे. झिंबाब्वेचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 17 ऑक्टोबरला आयर्लंडविरुद्ध होणार आहे

Related Stories

पंजाब प्रशासनाचे विकास ठाकुरला 50 लाखांचे इनाम

Patil_p

अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाला कठीण ड्रॉ

Patil_p

डेव्हिड वॉर्नर बहरात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा फडशा

Amit Kulkarni

WTC Final : न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 ची घोषणा

Archana Banage

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा

Patil_p

फिडे स्वीस बुद्धिबळ स्पर्धेत हरिका आघाडीवर

Patil_p