Tarun Bharat

एकनाथ शिंदेंना २०१४ ला युती तोडायची होती, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेने २०१९ ची विधानसभा निवडणुक भाजप (BJP) सोबत लढली. मात्र माख्यमंत्री पदारुन वाद झाल्याने शिवसेनेने नंतर राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यासोबत हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचं नवं सरकार स्थापन केलं. मविआ सरकार स्थापन झाल्याने भाजपाला धक्का बसला. त्यामुळेच सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. पण काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत भाजप बरोबर हात मिळवणी काजल सत्ता स्थापन केली. पण आता माविआ संदर्भांत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं ते २०१४-२०१९ मध्येच होणार होतं असा गौप्यस्फोट केला आहे. याच संदर्भांत अशोक चव्हाण म्हणाले, २०१४ रोजी भाजपा-शिवसेना (shivsena–bjp) युती काळात शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंसुद्धा सहभागी होते. शिवसेनेच्या कार्यकत्यांनी मुंबईतील कार्यालयातच माझी भेट सुद्धा घेतली होती.

हे ही वाचा : ‘पीएफआय’वरल कारवाईला विऱोध नाही; पण त्या कायद्याला विऱोध- खा. ओवैसी

भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने त्यावेळी. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला. पण ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच घेण्यात आली होती असा खुलासाही अशोक चव्हाण यांनी केला. पण यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करणे योग्य राहील असं अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुचवलं, पण शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याने पवारांची भेट घेतली नाही. पण या संदर्भात पुढे काय झालं याची माहिती नसल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Related Stories

राज्यसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढणार- संभाजीराजे छत्रपती

Archana Banage

परप्रांतीयांच्या जाण्याने भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध

Patil_p

सदरबाजारमध्ये दिवसभर तणाव

Patil_p

गंभीर मारहाण केलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Patil_p

पाणी पुरवठा सभापती सीता हादगे ऑन फिल्ड

Patil_p

मुंद्रा बंदरावर किरणोत्सारी पदार्थ जप्त

datta jadhav