उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे शरीर डिहायड्रेट होते यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी प्यायला हवे.जर शरीरामध्ये पाण्याची कमी भासली तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.यामुळे उन्हाळ्यात जेवण कमी पण पाणी जास्त पिण्याचा डॉक्टर देखील सल्ला देतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि अनेक आजार दूर होतात.पण त्याचे प्रमाण किती हवे. आपल्या शरीरासाठी किती पाणी आवश्यक आहे,हे जाणून घेऊयात.
सामान्य वातावरणामध्ये दिवसभरातून अंदाजे सात ते आठ ग्लास म्हणजे दीड लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुम्ही कोणत्या प्रकारच्या वातावरणात राहता? कोणत्या पद्धतीचे काम करता? यांसारख्या कित्येक गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला किती प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता आहे, याचा सल्ला दिला जातो.मात्र शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज उन्हाळ्यात भासते.त्यामुळेच या उष्णतेच्या दिवसांमध्ये निदान तीन लीटर पाणी प्राशन केले पाहिजे, जे होते अंदाजे १४ ते १६ ग्लास दिवसभरातून! अशावेळी साधारण पाऊण-एक तासाने पाणी प्यावे.
वयानुसार देखील पाण्याची गरज वेगवेगळी आहे. त्यामुळे १५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी दिवसभरात साधारण एक लीटर पाणी प्यायले पाहिजे. प्रौढ व्यक्तींनी साधारण तीन ते साडेतीन लिटर पाणी दररोज प्यावे.ज्यांना हृदय विकार असतो किंवा ज्या लोकांना किडनीच्या काही समस्या असतात, अशा लोकांनी दिवसभरात म्हणजेच २४ तासांत दीड ते दोन लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते, असे तज्ज्ञ सांगतात.
(वरील माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

