थंडीच्या दिवसात तीळ खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात शरीरात ऊब निर्माण होण्यासाठी आपण तिळाचे पदार्थ खात असतो.तिळाचे तेल देखील अनेक आजारांत उपयोगी ठरते.पण याव्यतिरिक्त तिळामध्ये अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.आज आपण बहुगुणी तिळाचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात.
थंडीच्या दिवसात त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. यावेळी त्वचाही कोरडी पडते. पण तिळात असलेल्या तेलामुळे त्वचेला खूप उपयोग होतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि नरम होण्यास मदत होते.तसेच त्वचेचा पोत देखील सुधारतो.
तिळाच्या तेलाने लहान मुलांची मालिश केल्यास त्यांची हाडे बळकट होतात.
मुळव्याधीवर ही तीळ उपयुक्त ठरतात.अशावेळी तीळ वाटून लोण्यासोबत खाल्ल्यास आराम मिळतो.
तिळात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम यासारखे घटक असतात. त्यामुळे हृदयाचे स्नायू सक्रिय राहण्यास मदत होते.
ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
संधिवाताचा त्रास असल्यास तिळाच्या तेलात हिंग,मोहरी,ओवा, सुंठ घालून मसाज केल्यास आराम मिळतो.
अनेकांची त्वचा ही कोरडी असते, अशा व्यक्तींना आहारात तीळाचा समावेश करावा. तीळामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
(टीप : कोणताही उपचार घेण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


previous post
next post