मध विविध प्रकारच्या पोषक तत्वांनी बनलाआहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, कार्बोहायड्रेट्स, अमीनो ऍसिड भरपूर प्रमाणात असतात.यामुळे याचा औषध म्हणूनही ही वापर केला जातो.पण या व्यतिरिक्त ही मधाचे अनेक फायदे आहेत,जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊयात मधाचे आणखी कोणते फायदे आहेत.
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे जखमा भरण्यासाठी मधाचा वापर केला जातो.
खोकल्यासाठी मध हा उत्तम उपाय आहे. मध प्यायल्याने घसादुखी आणि खवखव दूर होतो.
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मध खूप महत्वाचं काम करतो. कोमट पाण्यात थोडेसे मध टाकून ते रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील नको असलेली चरबी कमी होते.
मध हा प्रक्रिया न केलेला गोड पदार्थ आहे. ते थेट रक्तप्रवाहात मिसळते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देते.
त्वचेच्या आरोग्यासाठी मध हा मॉइश्चरायझिंगच काम करतो. त्वचेवर मध लावल्याने कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासही मदत होते.

