ऑनलाईन टीम/तरुण भारत
सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. त्याचप्रमाणे हसनेही तितकेच गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सहज आलेली स्माईल असो वा खळखळून हसणे, तुमचा आनंद व्यक्त करते. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य नुसते तुमच्या सौंदर्यात भर घालत नाही तर त्याचे अनेक फायदे आहे. हसल्याने कोणते फायदे मिळू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का?
हसल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा दूर होतो आणि तणाव कमी होतो. खास गोष्ट म्हणजे आपल्याकडे हसण्याचं काहीही कारण नसलं आणि तरीही आपण हसलो, तर तणावाची पातळी कमी होते. त्यामुळे तुम्ही अधिक तणावात असाल तर हसण्याचा प्रयत्न करा.हसल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा दूर होतो आणि तणाव कमी होतो. खास गोष्ट म्हणजे आपल्याकडे हसण्याचं काहीही कारण नसलं आणि तरीही आपण हसलो, तर तणावाची पातळी कमी होते. त्यामुळे तुम्ही अधिक तणावात असाल तर हसण्याचा प्रयत्न करा.
हसल्याने काय होते…
रक्तदाब कमी होतो: जगभरातील कोट्यावधी लोकं हाय ब्लड प्रेशरचा त्रास सहन करत आहे. ब्लड प्रेशर वाढले तर हार्ट ॲटॅकसह (Heart attack) अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. तुम्ही जर दररोज हसलात तर तुमचे ब्लड प्रेशर कमी होईल. ही बाब अनेक अभ्यासातून समोर आली आहे. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज हसले पाहिजे.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते : ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते ते लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ती मजबूत करण्यासाठी लोकं औषधांची मदत घेतात. मात्र ते हसत राहिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
तणाव कमी होतो: जे लोक विनाकारण हसतात त्यांच्यात तणाव कमी असल्याचे आढळून आले आहे. तुम्ही तणावाखाली असताना हसायला भाग पाडले तरी हा ताण कमी होतो. आणि निर्णय घेणे सोयीचे होते.
आयुष्य वाढवते: हे खूप विचित्र वाटत असले तरी ते खरे आहे. असे आढळून आले आहे की जे लोक जास्त हसतात ते जास्त काळ जगतात. त्यांचे आयुर्मानही वाढू शकते. कारण हसण्यामुळे काही हार्मोन्सचा स्राव वाढतो, जे शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात.
मूड सुधारतो : वाईट मूडमध्ये असताना जर एखाद्याने स्वतःला हसण्यास भाग पाडले तर त्याचा मूड नक्कीच सुधारेल. अनेक वेळा मूड खराब होण्याचे कारण देखील समजत नाही. लो फील होते. अशा वेळी जर ही युक्ती अवलंबली तर ते फायदेशीर ठरु शकते.
तर असे आढळून आले आहे की जे लोक खूप हसतात त्यांचा रक्तदाब बर्याच अंशी नियंत्रणात असतो. त्यांची अंतःकरणे देखील अधिक आरामदायक आहेत. आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.