उत्तम आरोग्यासाठी नेहमीच फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. मार्केट मध्ये देखील अनेक प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यामध्ये किवी हे फळ देखील पाहायला मिळते. किवीमध्ये व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, कॉपर, सोडियम, अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगांपासून संरक्षण करतात. हे असे फळ आहे जे आरोग्य आणि चवीने परिपूर्ण आहे.हे फळ शरीराला कसे फायदेशीर ठरते ते जाणून घेऊयात.
जर तुमची त्वचा खूप निस्तेज झाली असेल तर दररोज किवी फळ खा. यामुळे त्वचेला सोनेरी चमक येईल. केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
किवीमध्ये व्हिटॅमिन ‘के’ मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे हाडांचे आरोग्यही मजबूत होते. तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
ज्यांची दृष्टी कमकुवत आहे त्यांनीही किवीचे सेवन करावे, ते सुधारेल, त्यामुळे आतापासूनच याचे सेवन सुरू करा. यामुळे मानसिक ताणही कमी होतो.
किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ खूप फायदेशीर ठरते.


previous post