Tarun Bharat

ओसाकाला हरवून कोको गॉफ उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ सॅन प्रॅन्सिस्को

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सॅन जोस महिलांच्या खुल्या हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेची 18 वर्षीय टेनिसपटू कोको गॉफने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना आतापर्यंत चारवेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविणाऱया जपानच्या नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का दिला.

गेल्या जूनमध्ये कोको गॉफने प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. गुरुवारी झालेल्या सॅन जोस टेनिस स्पर्धेतील सामन्यात गॉफने ओसाकाचा 6-4, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. गॉफ आणि स्पेनची बेडोसा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. या स्पर्धेतील दुसऱया फेरीच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या बिगर मानांकित रॉजर्सने ग्रिसच्या टॉप सिडेड मारिया सॅकेरीचा 6-1, 6-3, चौथ्या मानांकित साबालेन्काने अमेरिकेच्या डुलहेडीचा 4-7, 6-1, 7-5, कुड्रेमेटोव्हाने अमेरिकेच्या लियुचा 6-2, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात आज दुसरी टी-20

Patil_p

विदर्भ क्रिकेट संघटनेकडून पंचांचे मानधन थकित

Patil_p

ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची दमदार सुरुवात

Patil_p

ज्युडोका सुशीला देवी ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

‘गंभीर’ भेटीत जिंकून गेले धोनीचे स्मित हास्य!

Patil_p

कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धा 9 मे पासून

Patil_p
error: Content is protected !!