लंम्पी आजाराच्या आदेशाचे भंग केल्याने महापालिकेची राजारामपुरीत कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पाळीव जनावरांना उघडय़ावर सोडण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील राजारामपूरी 14 व्या गल्लीतील रामा पसारे यांच्या गोठय़ातून लसीकरण केलेली एक गाय रस्त्यावर फिरत असल्याचे महापालिकेच्या पथकाच्या निदर्शनास आले. लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आदेशाचा भंग केल्याने पसारे यांच्यावर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. लंम्पी आजारानंतरचा प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे.
लंम्पी आजाराचा प्रदूर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कडक नियमावली केली आहे. लंम्पी आजार बाधित जनावरांना अलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. याचबरोबर पाळीव जनावरे गोठय़ाच्या बाहेर सोडू नयेत असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्यावतीने शहरात मोकाट फिरणाऱया जनावरांच्या मालकांवर कडक कारवाई सुरू केली आहे. संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. राजारामपुरीमध्ये अशाच प्रकारे एकावर गुन्हा दाखल केला. ही कारवइा& मनपा पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. विजय पाटील, आरोग्य निरिक्षक श्रीराज होळकर, मुकादम जितेंद्र कामत यांनी केली.
लसकरणीसाठी पाच टिम
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने लंम्पी आजाराच्या लसीकरणासाठी पाच टिम तयार केल्या आहेत. टीम मार्फत गेले चार दिवस शहरात लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत राजारामपूरी परिसरात पाळीव जनावरांचेही लसीकरण करण्यात आले.
‘तरूण भारत’च्या वृत्तानंतर यंत्रणा लागली कामाला
तरूण भारतने मोकाट जनावरांना लंम्पी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा जागी झाली. जनावरे बाहेर सोडणाऱयांवरच थेट गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यास सुरू केले.