Tarun Bharat

प्रादेशिक पर्यटन अंतर्गत अर्जूनी व कागलसाठी 1 कोटी 33 लाख निधी मंजूर – खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत कागल तालुक्यातील अर्जूनी येथील नरसिंह मंदीर परिसर विकासासाठी 70 लाख व कागल येथील काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीमधील रामलिंग देवालय विकासासाठी 63.63 लाख असा एकूण 1 कोटी 33 लाखाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात खासदार मंडलिक यांनी म्हटले आहे, सदर कामांना 2019 मध्ये प्रशासकीय मंजूरी दिलेनंतर स्थगीती देण्यात आली होती . सदर कामांची स्थगीती उठून त्यांना फेर प्रशासकीय मान्यता देणेबाबत मी पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सदर कामांना सन 2021-22 मध्ये पर्यटन व सांस्कृतीक कार्यविभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 31 मार्च 2022 अन्वये या कामांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सदर पर्यटन स्थळांचा सर्वांगीन विकास होण्यासाठी चांगली मदत होणार आहे. मंजूर कामामध्ये अर्जूनी येथील नरसिंह मंदीर परिसरातील मंदीराकडे जाणारा रस्ता करण्यासाठी 40 लाख, नरसिंह मंदीर परिसरात स्वागत कमान बसविण्यासाठी 5 लाख व नरसिंह मंदीर परिसरात निवास व वाहनतळ बांधण्यासाठी 25 लाख इतका निधी मंजूर झालेला आहे. तसेच कागल येथील काळम्मावाडी धरग्रस्त वसाहतीमध्ये रामलिंग देवालय परिसरामध्ये सांस्कृतीक हॉल बांधण्यासाठी 32 लाख रुपये तसेच मंदीर परिसरामध्ये दुकानगाळे बांधण्यासाठी 26 लाख व देवालयाच्या परिसरामध्ये स्वागत कमान बांधण्यासाठी 4.82 लाख इतका निधी मंजूर झाला असल्याचे पत्रकात नमूद आहे.

Related Stories

लतादीदींच्या जन्मदिनानिमित्त राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा, पोस्ट व्हायरल

Archana Banage

ईएसबीसी आरक्षणातील नियुक्त्या कायम

Archana Banage

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याच्या वक्तव्यावर राजेश टोपे म्हणाले, शब्दाचा विपर्यास करू नये ..

Archana Banage

शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले, तिघांचा मृत्यू

datta jadhav

‘आरोग्य’मध्ये स्थानांतरण, काम बांधकाम विभागात

Archana Banage

लान्स नायक भीमराव माने यांचे निधन

Abhijeet Khandekar