Tarun Bharat

१०० सेकंद कृतज्ञतेचे..ओडिशा येथून शाहू महाराजांना अभिवादन

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्ताने कोल्हापूरात शुक्रवार दि. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. कोल्हापूरातील शाहु स्मृतीस्थळ, दसरा चौक, शासकीय व प्रशासकिय कार्यालये, महविद्यालये यांमधून राजांना आदरांजली वाहण्यात आली.

पण फक्त कोल्हापूरातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून महाराजांना अभिवादन करण्यात आले आहे. कसबा बावडा येथील राहणारे केदार मानसिंग जाधव हे सध्या ओडिसा येथील श्री श्री युनिव्हर्सिटी येथे शिक्षण घेत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी सर्व कोल्हापूर स्तब्ध राहणार आहे असे कऴल्यावर एक कोल्हापूरकर म्हणूऩ केदार जाधव यांनीही श्री श्री युनिव्हर्सिटी, ओडिशा येथे शंभर सेकंद स्तब्ध राहून शाहुराजांना अभिवादन केले.

तसेच आयटीआय कळंबा परिसरात राहणाऱ्या ऋषिकेश पानारे यांनी चेन्नई येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना 100 सेकंद स्तब्ध राहून वंदन केले ऋषिकेश हे मूळचे कोल्हापूरचे असले तरी सध्या ते चेन्नई येथील एनएसटीआय चेन्नई येथे आयटीआय ट्रेड शिकत आहेत. यावेळी ऋषिकेश यांनी चेन्नईतून मानवंदना देत आपला सहभाग नोंदवला.

Related Stories

अन्यथा गुऱ्हाळ घरं बंद ठेवणार

Abhijeet Shinde

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

Rohan_P

डॉ. फैसल सुलतान पाकचे नवे आरोग्यमंत्री

datta jadhav

ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांचे निधन

Abhijeet Shinde

लॉकडाऊननंतर कोल्हापुरातूनच मराठय़ांचा पुन्हा एल्गार

Abhijeet Shinde

‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’ हा राणेंचा ‘जावईशोध’; एकनाथ शिंदेंचा राणेंना टोला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!