आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, अर्थतज्ञ जे. एफ. पाटील यांचा समावेश : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, ‘स्वाभिमानी’ च्या कार्यकर्त्यांची वर्णी : शासनाकडून नियुक्तीचे आदेश जारी
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून गुरुवारी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. एफ. पाटील यांच्यासह 20 जणांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेका पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार नियोजन विभागाचे उपसचिव एस. एच. धुरी यांनी नियुक्तीचे आदेश काढले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून या नियुक्त्या करण्यात आल्या. आमदारांसह विविध क्षेत्रातील तज्ञ व महाविकास आघाडीतील पक्षांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे.
विधानमंडळ सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्य म्हणून शिवसेनेचे राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून अर्थतज्ञ जे. एफ. पाटील (कोल्हापूर), एम. एस. देशमुख (मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर), संभाजी शामराव पवार (लाटवडे, ता. हातकणंगले), माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पुंडलिक पाटील (शिये, ता. करवीर) यांची, तर जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मधुकर शामराव जांभळे (बालिंगे ता. करवीर), जयसिंग कोडीबा पाटील (सुळंबी, ता. राधानगरी), माजी उपमहापौर संजय वसंतराव मोहिते (साईक्स एक्सटेंशन, कोल्हापूर), भगवानराव गणपतराव जाधव (रुकडी, ता. हातकणंगले), भारत बाबासाहेब पाटील ( भुये, ता. करवीर), प्रेमला दिपक पाटील (कोरोची, ता. हातकणंगले), सर्जेराव सदाशिव शिंदे (दानोळी, ता. शिरोळ), क्रांतीसिंह संपतराव पवार-पाटील (सडोली खालसा, ता. करवीर), माजी नगरसेवक सुरेश गणपती ढोणुक्षे (राजारामपुरी, कोल्हापूर), माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल उर्फ सावकार बाळू मादनाईक (उदगांव, ता. शिरोळ), सचिन उर्फ युवराज बाळासाहेब पाटील (गडमुडशिंगी, ता. करवीर), मोहन तुकाराम धुंदरे (राशिवडे, ता. राधानगरी), माजी पंचायत समिती सदस्य तानाजी गणपती आंग्रे(वरणगे. ता. करवीर), पोपट पांडूरंग दांगट (गड मुडशिंगी, ता. करवीर) यांची नियुक्ती करण्यात आली.