ना. मा. प्रवर्गासाठी 3, अनुसुचित जातीसाठी 2 जागा आरक्षित
पन्हाळा / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातवे, माले, कोडोली पश्चिम, कोडोली पुर्व, कोतोली, बोरिवडे, पुनाळ, बाजारभोगव, कळे, वेतवडे, वाडीरत्नागिरी, पोर्ले तर्फ ठाणे, यवलुज वाघवे य़ा एकुण 14 पंचायत समितीच्या मतदारसंघातील आरक्षण जाहीर करण्यात आले. नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय़ अधिकारी बी.आर माळी, तहसिलदार रमेश शेंडगे, नायब तहसिलदार विनय कौलवकर याच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.
या सोडतीसाठी श्रद्धा सावंत व श्रेयस आंबेकर या शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. एकुण 14 पैकी 7 जागा या महिलांसाठी राखिव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसुचित जातीसाठी 2, ना.मा.प्रवर्गासाठी 3 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. यावेळी मतदार संघनिहाय प्रारुप नकाशाही खुला करण्यात आला. कोडोली पुर्व व वाडी रत्नागिरी हे दोन मतदार संघ लोकसंख्येच्या नुसार व रोटोशन पध्दतीने अनुसुचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. यापैकी एक जागा अनु. जाती महिला आरक्षित ठेवण्यासाठी चिठ्ठी काढण्यात आली, त्यानुसार कोडोली पुर्व हा गण अऩु. जाती महीलांसाठी तर वाडीरत्नागिरी अऩु. जातीसाठी आरक्षित झाले.
तसेच ना.मा.प्रवर्गासाठी पोर्ले तर्फ ठाणे, यवलुज, वाघले हे तीन मतदारसंघ आरक्षित करण्यात आले. त्यापैकी 2 जागा महिलासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. रोटेशन पद्धतीने पोर्ले तर्फ ठाणे व वाघवे हे गण ना.मा.प्रवर्ग महिलांसाठी तर यवलुज ना.मा.प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. 14 पैकी 9 जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आल्या असल्या तरी यापैकी चार जागा या महिलांसाठी आरक्षित ठेवल्याने चिठ्ठी काढण्यात आल्या. त्यानुसार कोडोली पश्चिम, कोतोली, पुनाळ, कळे गणात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले. त्यामुळे उर्वरित सातवे, माले, बोरिवडे, बाजारभोगाव, वेतवडे हे पाच गण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले.
एकुणच तालुक्यात दोन गणांची झालेली वाढ व मतदार संघात झालेला बदल व पडलेले आरक्षणामुळे काही मातब्बरांना धक्का तर काहींना फायदा झाल्याचे चित्र समोर आले आहे.
पंचायत समिती गण व पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे.
कोडोली पूर्व- अनुसूचित जाती महिला
वाडीरत्नागिरी- अनुसूचित जाती
पोर्ले/ठाणे- नागरिकांचा मागास प्र वर्ग महिला
वाघवे – नागरिकांचा मागास प्र वर्ग महिला
यवलूज- नागरिकांचा मागास प्र वर्ग
कोडोली- पश्चिम-सर्वसाधारण महिला
कोतोली- सर्वसाधारण महिला
पुनाळ- सर्वसाधारण महिला
कळे- सर्वसाधारण महिला
सातवे- सर्वसाधारण
माले- सर्वसाधारण
बोरीवडे- सर्वसाधारण
बाजार भोगाव- सर्वसाधारण
वेतवडे – सर्वसाधारण