Tarun Bharat

कसबा बावडय़ातील रस्ते व हॉकी ग्राऊंडसाठी 60 लाखांचा निधी- संजय मंडलिक

कसबा बावड्य़ात विकास कामांचे उद्घाटन

कोल्हापूर / प्रतिनिधी

कसबा बावडा येथील रस्ते व हॉकी ग्राऊंडसाठी 60 लाखाचा निधी मंजूर केला असून लवकरच कोटय़ावधी रूपयांची विकास कामे मंजूर करणार असल्याची ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयामार्फत ‘नागरी भागातील नागरीकांच्या मुलभुत सोई, सुविधा पुरविणे’ या योजने अंतर्गत कसबा बावडा येथील रस्ते व हॉकी ग्राऊंडसाठी मंजूर झालेल्या 60 लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला. उत्तर विधानसभा मतदार संघाच्या आमदार जयश्री जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

कसबा बावडा येथे मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये बिरंजे, खामकर,रेडेकर – रेणोसे पाणंद रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी 20 लाख, पद्मा पथक हॉकी ग्राऊंडसाठी 20 लाख , प्रभाग क्र.4 मधील विविध विकास कामांसाठी 20 लाख, आदी कामांचा समावेश असून कसबा बावडा येथील विविध विकास कामांसाठी लवकरच कोटय़ावधी रुपयेचा निधी मंजूर करणार असल्याची ग्वाही खासदार मंडलिक यांनी दिली.
या कार्यक्रमास श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, संचालक पांडूरंग बिरंजे, विलास बिरंजे व सर्व संचालक मंडळ, सदस्य तसेच माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अशोक जाधव, श्रावण फडतारे, संजय लाड, संदीप नेजदार, मोहन सालपे, आदी मान्यवरांसह नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील यांनी केले. माजी नगरसेवक सुभाष बुचडे यांनी आभार मानले.

Advertisements

Related Stories

केंद्रिय मंत्री ‍नितीन गडकरी शनिवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर

Sumit Tambekar

कळंबा कारागृहात कैद्यावर प्राणघातक हल्ला

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका : अजित पवार

Rohan_P

महाराष्ट्रात मागील 24 तासात 1408 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

बापानेच घोटला आरवचा गळा

Abhijeet Shinde

सात प्रकल्पग्रस्त वसाहतींची होणार ग्रामपंचायत

Sumit Tambekar
error: Content is protected !!