वारणानगर/प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कोडोली – बोरपाडळे राज्य मार्गावर माले गावच्या हद्दीत काखे फाट्यावरील हॉटेल . शिवम समोर सोमवार . दि. १८ दोजी रात्री ११ वा. पूर्वी मोटर सायकल वरून पडल्याने महाविद्यालयीन तरूण जागीच ठार झाला. अभिषेक राजेंद्र कासुळे (रा. भालगावता पाथर्डी जि. अहमदनगर) असे मयत तरूणाचे नाव असून यामध्ये ओमकार संदिप गारडे (रा. सातारा) हा जखमी झाला असून त्याचेवर प्राथमिक आरोग्य केंद्र बोत्याडळे येथे उपचार सुरू आहेत.
शिवम हॉटेलचे मालक प्रशांत तानाजी नलवडे (रा. मोहरे, ता. पन्हाळा) यांनी कोडोली पोलीस ठाण्यात आपघाताची वर्दी देवून जखमी ओमकार गारडे या मित्राच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले तर यातील मयत अभिषेक कासुळे यास उपचारास नेण्यासाठी बोलवलेल्या १०८ रुग्णवाहिकेसोबत आलेल्या वैयकीय अधिकारी यानी अभिषेक यास तपासले असता तो जागीच मयत झाल्याचे घोषीत केले.
मयत अभिषेक व जखमी ओमंकार हा बोर पाडळे येथील महाविद्यालयात बीएस्सी नर्सिग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असल्याचे समजते. पहाटे दुचाकी मोटर सायकल वरून पडल्याने हा आपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी सांगीतले आहे. अभिषेकले नातेवाईक पोहचल्यावर त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. अधिक तपास पो. ना. काटकर करीत आहेत.