Tarun Bharat

Kolhapur : तोल जाऊन विहिरीत पडल्याने शिरटी मधील एकाचा मृत्यू

शिरोळ : प्रतिनिधी

विहिरीतील एचटीपीमधून पाणी का येत नाही हे पाहण्यासाठी गेले असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने सचिन राजाराम कुंभार (वय.४१, रा. शिरटी, ता.शिरोळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी मारुती शिवमूर्ती कुंभार यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे. मृत कुंभार हे येथील अर्जुनवाड रस्त्यालगत असणाऱ्या बुवाफन नगर येथे गाड्या सर्व्हिसिंग करण्याचे काम करीत होते.

पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन कुंभार हे विहीरीतील एचटीपीमधून पाणी का येत नाही हे पाहण्यासाठी गेले असताना त्यांचा तोल जाऊन विहिरीत ते पडले. यावेळी त्यांच्या डोक्यास,हाताला मार लागून नाकातून रक्त येऊ लागले. दरम्यान उपचारासाठी त्यांना शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या मागे आई,पत्नी असा परिवार आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार नाईक करीत आहेत.

Related Stories

गर्दीच्या ठिकाणी महिला स्वच्छतागृहे वाढवण्याची गरज

Kalyani Amanagi

खडकातील भेगेमुळे मेघोलीची दुर्घटना

Archana Banage

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात महिलेसह तिघांचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage

मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करा

Archana Banage

चलो पुणे…संभाजीराजे 12 तारखेला करणार भूमिका जाहीर

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!