Tarun Bharat

शिरोळ पोलिसांची मोठी कारवाई; सुमारे १० लाखाची सुगंधी सुपारी व तंबाखू जप्त

Advertisements

शिरोळ/प्रतिनिधी

कर्नाटक राज्यातून शिरोळ मार्गे लातूरला जाणारा बेकायदेशीर गुटखा व सुगंधी सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थ यावर शिरोळ पोलिसांनी कारवाई करून सुमारे 13 लाख 93 हजार 760 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास येथील शिरटी फाट्या शेजारील हॉटेल समोर करण्यात आली.

याबाबत शिरोळ पोलिसांनी सांगितले की,  शिरोळ मार्गे कर्नाटक राज्यातून गुटखा आणण्यासाठी महिंद्रा बोलोरो पिकअप या चार चाकी वाहनातून लातूर जिल्ह्यातील संशयित दोघे गेले होते. यावेळी कर्नाटक राज्यातील हिरा नावाचा गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ असा सुमारे 8 लाख 93 हजार 760 रुपयाचा गुटखा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पोमध्ये भरून शिरोळ दिशेने हे वाहन येत असल्याची खबर शिरोळ पोलिसांना एका बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून शिरटी फाट्यावर थांबले असता नृसिंहवाडीहून शिरोळकडे आलेला हा टेम्पो क्र. (mh 24 ab 8166) पोलिसांनी अडवला. चालकाकडे अधिक चौकशी केली असता तो गोंधळून गेला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्या टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला भाजीपाला वाहतुकीसाठी असणारे प्लास्टिक कॅरेट लावले होते, तर आतील बाजूस ठेवलेला गुटखा व सुगंधी सुपारी आणि  तंबाखूजन्य पदार्थ यांची पोती आढळून आली. सदरचे वाहन पोलिसांनी जप्त करून संशयित दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता हा गुटखा व सुगंधी सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थ कर्नाटक राज्यातून लातूरकडे बंटी ( पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या व्यक्तीकडे  नेत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. शिरोळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे आठ लाख 93 हजार 760 रुपयाचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ व पाच लाखाचे वाहन असे अंदाजे 13 लाख 93 हजार 760 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यामध्ये 1 लाख 88 हजार 160 रुपये किमतीचे हिरा पत्तीचे 28 बॅगा तसेच हिरा पान मसाला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या 56 बॅगा त्याची किंमत सात लाख पाच हजार सहाशे रुपये इतकी आहे, तसेच 25 प्लॅस्टिकचे तुटलेले कॅरेट असा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपी अमरपाशा मेहर शेख (वय 28 वर्षे, रा. इस्लामपूर जि. लातूर) व रफिक महमद शेख ९वय 32 वर्षे, रा. इस्लामपूर जिल्हा लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे, दत्तात्रय भोजणे, पोलीस हवलदार ज्ञानेश्वर सानप, ताहीर मुल्ला, कडुबा जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  भोजणे हे करीत आहेत.

Related Stories

महात्मा फुले जीवनदायीत कोल्हापुरातील ४४ दवाखान्यांचा समावेश

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कळंबा कारागृहात पुन्हा सापडले १० मोबाईल्स आणि गांजा

Abhijeet Shinde

शहरातील प्रत्येक गल्लीतील पाण्याचा सर्व्हे करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 9 जणांवर गुन्हा

Abhijeet Shinde

जयसिंगपूर बाजार समितीमध्ये रेशीम कोष बाजारपेठ सुरू होणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजार ऑक्सिजन बेडचे नियोजन : पालकमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!