Tarun Bharat

कोल्हापूर अकादमी, नीना स्पोर्ट्स संघ विजयी

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

आनंद क्रिकेट अकादमी आयोजित प्रेसिडेंट चषक 13 वर्षाखालील आंतरकॅम्प क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादिवशी कोल्हापूर क्रिकेट अकादमी संघाने सुनील नाईक अकादमी सावंतवाडी संघाचा 64 धावांनी तर नीना क्रिकेट अकादमी संघाने सुनील नाईक क्रिकेट अकादमी संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. इशान देवने व समर्थ चौगुले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

भुतरामहट्टी येथील भगवान महावीर जैन टर्फ विकेट मैदानावर प्रमुख पाहुणे सुनील नाईक क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक अब्बू व अनिल साळगावकर कोल्हापूर, महेश जवळी, ईश्वर इटगी आदी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात कोल्हापूर क्रिकेट अकादमी संघाने  25 षटकात 3 बाद 209 धावा केल्या. इशान देवनने 10 चौकारासह 86 तर अर्जुन पाटीलने 7 चौकारासह नाबाद 69 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे यश भिसेने 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सुनील नाईक क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाचा डाव 24.5 षटकात सर्व बाद 145 धावात आटोपला. धैर्यशील सावंतने 21 तर संकेत जाधवने नाबाद 19 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे आदित्य पाटोळेने 3, मिजबा सय्यद व आयुष घोरपडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दुसऱया सामन्यात सुनील नाईक अकादमी सावंतवाडी संघाने 22 षटकात 9 बाद 93 धावा केल्या. प्रज्वल मडगावकरने 19, दुर्वांग सरमरकरने 13 धावा केल्या. नीनातर्फे सर्वज्ञ व जीयान यांनी प्रत्येकी 2 तर समर्थ चौगुलेने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना स्पोर्ट्स संघाने 16 षटकात 4 बाद 96 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. समर्थ चौगुलेने 22 तर अभिनवने नाबाद 20 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे यश भिसेने 2 गडी बाद केले.

Related Stories

मसाज पार्लरवर पोलिसांची करडी नजर

Amit Kulkarni

चंदगडच्या गंधर्वगड-केरवडे परिसरात वाघ

Rahul Gadkar

‘हुक्केरी’त एक लाखाचा दंड वसूल

Patil_p

दोन लाख कुटुंबे हक्काच्या छप्पराविना

Amit Kulkarni

बेळगुंदी-पिरनवाडी परिसरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

Patil_p

हुतात्मादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन तालुका म. ए. समितीचे आवाहन

Amit Kulkarni
error: Content is protected !!