coronacomeback- चीन मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात मोठी खळबळ उडालीय. भारतात देखील खबरदारीच्या दृष्टीने पावले उचलली जात असून केंद्र सरकारने धास्ती घेतली असून राज्यांना सतर्क राहण्याचे आदे सरकारकडून देण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळावर (Kolhapur Airport) आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या इतर सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळावर खबरदारी घेण्याबरोबरच देशांतर्गत विमानतळावरही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर देशभरातील सर्वच विमानतळांवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. नियमांचे पालन करण्याचे आवाहन कोल्हापूर विमानतळाचे (Kolhapur Airport) संचालक अनिल शिंदे यांनी केले आहे. कोरोनो प्रतिबंधात्मक नियमानुसार मास्क, सॅनिटायझर्सचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.