Tarun Bharat

Kolhapur; विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने

शिवाजी विद्यापीठ विद्या परिषदेच्या बैठकीत निर्णय

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याचा निर्णय सोमवारी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विद्यापीठाच्या या निर्णयाचे सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. असे असले तरी परंतू परीक्षेची तयारी करण्यात वेळ जाणार असल्याने जवळपास एक महिना परीक्षा पुढे जावू शकतात, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.

कोरोनानंतर राज्यातील सर्वच विद्यापीठ परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने कुलगुरूंशी चर्चा करून घेतला होता. परंतू या निर्णयाला सुरूवातीला लॉ अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. एकीकडे लॉचे विद्यार्थी चक्क रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे न्यायालयात याचिका दाखल केली. विद्यापीठ अधिविभाग, महाविद्यालयातील चक्क 2 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लॉ आणि अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केला. त्यानंतर शुक्रवारी विद्यापीठातील इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही सर्व विषयाच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घ्या, या मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठाने सर्व परीक्षा स्थगित केल्या. सोमवारी विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा करून सर्व विषयाच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे असले तरी परीक्षा जवळपास एक महिना पुढे जातील हे निश्चित आहे. या वेळेत तरी विद्यार्थ्यांनी आपली अपुर्ण प्रॅक्टीकल, जर्नल पुर्ण करावीत, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.

ऑफलाईन एमसीक्यू परीक्षेसाठी या अटी
विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर स्तरावरील परीक्षा ऑफलाईन पध्दतीने (प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर हजर राहून) 50 गुणांची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित (प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न प्रत्येकी 2 गुण), परीक्षेचा वेळ एक तासाचा असून बहुपर्यायी प्रश्नावली (एमसीक्यू) पध्दतीने घेण्यात येणार आहे. यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणाऱया शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी. पदवी व पदव्युत्तर स्तरावरील परीक्षेचे सविस्तर सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी प्रश्नसंचिक, ज्यादाची वेळ, दोन पेपरमध्ये अंतर इत्यादी बाबींची मुभा असणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्रश्नपत्रिका, ओएमआर शीट तयार करण्यात वेळ जाणार
शिवाजी विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याची पूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाने केली होती. परंतू विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत सर्व पयीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा प्रश्नपत्रिका तयार करणे, जवळपास चार लाख ओएमआर शीट तयार करणे यामध्ये एक महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात विद्यापीठ परीक्षा होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

Related Stories

आशियाई चषक स्पर्धा यजमानाची निवड लांबणीवर

Patil_p

राहुलच्या चिवट फलंदाजीने भारताला नाममात्र आघाडी

Patil_p

इपीएफओत ऑगस्टमध्ये 10.50 लाख नवी खाती

Omkar B

अनिल देशमुखांच्या याचिकेवरील सुनावणीला सुप्रिम कोर्टात सुरूवात

Abhijeet Shinde

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रतापगंज पेठेत शिरला कोरोना

Patil_p

खानापूर नगरपंचायत भाजपा स्वबळावर लढणार : आमदार पडळकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!