Tarun Bharat

पुणे मनपाच्या धर्तीवर रस्त्याचे डांबरीकरण करा

आमदार सतेज पाटील यांच्या आयुक्तांना सूचना : काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी खड्डेमय रस्त्याबाबत मांडली व्यथा

प्रतिनिधी/कोल्हापूर

पावसाळ्यात रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे काम महानगरपालिकेच्यावतीने तातडीने करावे, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे शुक्रवारी काँग्रेस कमिटी कार्यालयात केली. यावेळी पुणे महापालिका कार्यक्षेत्रात रस्त्याचे खड्डे मुरुम टाकून बुजवण्याऐवजी डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्ते केले जात आहे. अशाच प्रकारे कोल्हापूरातही थेट डांबरीकरणाच्या माध्यमातून खड्डे बुजवावेत अशा सूचना आमदार पाटील यांनी मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे यांना दिल्या. तसेच याबाबत आयुक्त बलकवडे यांच्यासोबत सोमवारी सोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांना आणि वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समोर ही समस्या मांडली. किमान पावसाळ्या पुरती तात्पुरत्या स्वरूपात तरी हे खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार पाटील यांनी सोमवारी माजी नगरसेवक सोबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही त्यांना दिली. त्याचबरोबर प्रशासनाला दिलेल्या सुचने प्रमाणे सध्या पावसात सुद्धा थेट पाईपलाईनचे अपुरे काम सुरू आहे. पुढील आठवडय़ात माजी नगरसेवक, महानगरपालिका प्रशासनासोबत थेट पाईपलाईची पाहणी करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळात शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, प्रकाश नाईकनवरे, अशोक जाधव, भूपाल शेटे, मधुकर रामाने, सुभाष बुचडे, अर्जुन माने, अमर समर्थ, रियाज सुभेदार संदीप नेजदार, उमेश पोवार, लाला भोसले आदीं सहभागी होते.

Related Stories

मांडेदुर्ग येथील पुलाच्या कामाची चौकशी करा

Archana Banage

…अन्यथा गनिमी काव्याने सीमाभागात प्रवेश करणार

Archana Banage

अहंकार सोडा अन्यथा सांगली जिल्ह्यातील कारखाने आजारी पडतील: राजू शेट्टी

Archana Banage

कबनूर ओढ्यातील मासे मृतावस्थेत; शाश्वत उपायांची आवश्यकता

Archana Banage

रेशन दुकाने, पुरवठा कार्यालये होणार ‘चकाचक’

Archana Banage

गोशिमाच्या अध्यक्षपदी मोहन पंडितराव

Archana Banage