Tarun Bharat

Kolhapur : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरील प्रकार; दानोळीच्या संतोष कांबळेला घेतले पोलिसांनी ताब्यात; जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये अनुकंपा तत्वाखाली दाजींना नोकरी मिळत नसल्याचे कारण

कोल्हापूर : जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये अनुकंपा तत्वाखाली दाजींना नोकरीस घेत नसल्याच्या कारणावरून मंगळवारी दुपारी संतोष राजू कांबळे (रा. दानोळी, ता. शिरोळ) याने जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच बैठकीसाठी आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे खळबळ उडाली. दरम्यान येथील कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी त्याच्या हातातील रॉकेलचा कॅन काढून घेऊन त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी, जयसिंपूर नगरपालिकेत 2007 सालापासून बहिणीचे पती परशराम कांबळे यांना अनुकंपा तत्वाखाली नोकरी न दिल्याने तसेच अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याने हे कृत्य केले असल्याची माहिती दाजी परशराम कांबळे आणि संतोष कांबळे यांनी पोलिसांना दिली. जिल्हाधिकारी यांच्या दालना बाहेरच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली.

मंत्री पाटील आणि समरजितसिंह घाटगे हे दोघेही जिल्हाधिकारी कार्यालयात कागल येथील झोपडपट्टीवाशीयांच्या प्रश्नावरील बैठकीसाठी आले होते. बैठक संपल्यानंतर कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरला. याचवेळी मंत्री पाटील,घाटगे आणि जिल्हाधिकारी दालनाच्या बाहेर आले असता संतोष कांबळे याने त्यांच्यासमोरच कॅमधील रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. काही अंतरावर त्याचे दाजी परशराम ही होते. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांचे चालक विनोद भापकर, शिपाई राजू भालचिम, दिलीप वडार व अंगरक्षक अविनाश नाळे यांनी त्याला पकडून त्याच्याकडील कॅन काढुन घेत पकडून ठेवले. यानंतर त्याला पोलिस उपनिरीक्षक गजानन परीट यांच्या ताब्यात देण्यात आले. येथून त्याला शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

प्रसंगी रिक्त स्टेडियममध्ये आयपीएल खेळवा

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात रात्री आठ पर्यंत 208 रुग्णांची भर, ८ मृत्यू

Archana Banage

जागतिक ‘पर्यावरण दिन’ २०२२

Rohit Salunke

गगनबावडा-मर्द किल्ले गगनगड येथील पर्यटनाचा केंद्रबिंदू

Abhijeet Khandekar

Kolhapur: म्हासुर्ली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत भेकर प्राणी गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

बिहार : भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Tousif Mujawar