शाहू जयंतीनिमित्त प्रबोधनपर उपक्रम : लोकोत्सव समितीचा पुढाकाराला रेशन दुकानदार संघटनेची साथ
प्रतिनिधी/कोल्हापूर
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार आहे. राजर्षी शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीच्या वतीने शाहू जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हय़ातील बारा तहसिलदार कार्यालयासमोर जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहे. या फलकांचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले.
जिल्हा सरकारमान्य रास्त भाव रेशन दुकानदार संघटनेने हे जनजागृती करणारे फलक दिले आहेत. शहरातील करवीर तहसीलदार कार्यालयासमोर उभारलेल्या फलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शेकाप चिटणीस बाबुराव कदम, दीपक काटक। दुर्गेश लिंग्रस, जनता दलाचे रवींद्र जाधव, राजेंद्र कुरणे, लोकोत्सवाचे अध्यक्ष कॉ.चंद्रकांत यादव यांच्या हस्ते ाढरण्यात आले याप्रसंगी संघटना अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष तुकाराम खराडे, सचिव नामदेव गावडे, sसंभाजीराव जगदाळे, गणी आजरेकर, राजू लाटकर, संजय माळी, श्रीकांत भोसले, सुनंदा माळवी, शीला पत्रावळआदींसह करवीर तालुक्यातील रेशन दुकानदार उपस्थित होते. शाहू जयंतीदिनी 26 जूनला काढण्यात येणाऱया मिरवणुकीत रेशन दुकानदार सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.