सहाय्यक कामगार आयुक्तांची कारवाई; तीन व्यापाऱ्यांविरोधत खटला दाखल, तीन व्यवसायिकांना आर्थिक दंड
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील सर्व व्यापारी, व्यावसायिक अस्थापनांनी आपले नामफलक मराठी भाषेत (देवनागरी लिपी) लावण्यासंदर्भात कायदा केला आहे. या कायद्याचे उल्लंघन केलेल्या शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांना सहाय्यक कामगार आयुक्तांनी दणका दिला आहे. तीन व्यापाऱयांविरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांकडे न्यायालयात खटले दाखल केले आहेत. तर तीन व्यापाऱयांवर दंडाची कारवाई करून दंड वसुलही करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अंतर्गत 17 मार्च 2022 च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियम 2017 च्या कलम 36 क (1) नुसार दुकाने, व्यापारी, अस्थापना, हॉटेल्स आदी विविध अस्थापनांमध्ये माराठी देवनागरी लिपीत नामफलक लावण्यासंदर्भात अंमलबजाविणचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने तपासणी सुरू आहे. या तपासणीदरम्यान, ज्या अस्थापनांनी मराठीतील नामलफलकाच्या नियमाची अंमलबजावणी केलेले नाही, त्यांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने पहिल्या टप्प्यात तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मराठी नामफलक नसलेल्या सहा अस्थापना आढळून आल्या. त्यांना तपासणीनंतर कारणे दाखवा नोटिस काढण्यात आली. त्यामध्ये उत्तर देवून सामोपचाराने दंड भरण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये तीन अस्थापनांनी दंड भरला. उर्वरीत तीन अस्थापनांनी नोटिशीला उत्तर न दिल्याने त्यांच्या विरोधात राज्याच्या कामगार आयुक्तांची परवानगी घेऊन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात केलेल्या कारवाईविषयी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी पत्रकाव्दारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे की : मराठी लिपीतील नामफलकाच्या अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्या प्रकरणी सहा अस्थापनांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. त्यातील राजारामपुरीतील मोक्ष कलेक्शनला दोनहजार रूपये तर राजारामपुरीतील एका अस्थापनासह मध्यवर्ती बस स्थानक येथील जाजल पेट्रोल पंपला प्रत्येक पाचहजार रूपयांचा दंड करण्यात आला. ज्या अस्थापनांनी नोटिसांना प्रतिसाद दिल्ना नाही अशा महापालिकेजवळील राजासाब, राजारामपुरीतील एक आणि सासने मैदान ताराबाई पार्क येथील अशंना फूडस् या अस्थापनाविरोधात प्रथम न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयात 4 ऑगस्ट रोजी खटला दाखल करण्यात आला आहे.
गांधीनगरातही सहा दुकानदारांवर कारवाई
महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियमाचे उल्लंघन केलेल्या आणि नोटिशीनंतर अपराध आपसात मिटविण्यासाठी विनंती अर्ज केलेल्या गांधीनगरातील सहा अस्थापना अर्थात दुकान मालकांकडून आर्थिक दंड वसुल करण्यात आला. लक्ष्मी सारीज, आर्शीवाद डेस मटेरियल, अमृत कलेक्शन, मुंबई होजिअरी, विजय टेक्सटाईल्स, मेन रोड आणि लालसाई कलेक्शन सिंधू मार्केट यांच्याकडून प्रत्येक पाचहजार रूपये तर विजय टेक्सटाईलकडून सातहजार रूपयांचा दंड आकारण्यात आला.
राज्य शासनाने केलेल्या अधिनियमानुसार मराठी लिपीत नामफलक लावणे अनिवार्य आहे. त्याची अंमलबजावणी सर्व व्यापारी, अस्थापनांनी करावी. नामफलकावर आमच्या पथकाचा वॉच आहे. अनियमाचा भंग करणाऱयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
अनिल गुरव, सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर