Tarun Bharat

कोल्हापूर-बेंगळूर विमानसेवा 13 जानेवारीपासून सुरू

नववर्षांत इंडिगोच्या विमानाचा टेकऑफ : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती : कोईमतूरपर्यंत विमानसेवेचा विस्तार

कोल्हापूर / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून बंद झालेली कोल्हापूर ते बेंगळूर या हवाई मार्गावरील विमान सेवा पुन्हा सुरू होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. विशेष म्हणजे इंडिगो एअर लाइन्सकडून आठवडय़ातील सातही दिवस कोल्हापूर- बेंगळूर विमान सेवा सुरू होत आहे. याच फ्लाईटचा विस्तार कोईमतूर पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर ते कोईमतुर व्हाया बेंगळूर अशी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होणार आहे. 13 जानेवारी पासून सुरू होणाऱया या विमान सेवेसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे खंडित झालेली कोल्हापूर-बेंगळूर विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्यावर शिक्कमोर्तब झाले आहे.

Related Stories

कुख्यात गुंडांची पोलीसांसोबत झटापट

Archana Banage

धनगरी ढोल, गजनृत्याने अहिल्यादेवी, शाहूंना अभिवादन

Archana Banage

ऑनलाईन सभेचा बट्टयाबोळ,सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

Archana Banage

कोल्हापूर : शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

Archana Banage

राधानगरी धरणात 28.34 टक्के पाणीसाठा

Abhijeet Khandekar

शाहूवाडी-शिराळा सीमा अजूनही लॉकडाऊन ; नागरिक संतप्त

Archana Banage