Tarun Bharat

चैनीसाठी दुचाकींची चोरी, ६ जण जेरबंद

24 दुचाकी जप्त : चोरट्य़ांसह, विकणारेही अटकेत : तपास पथकास 20 हजारांचे बक्षीस

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

चैनीसाठी दुचाकी चोरणाऱया 6 जणांच्या टोळीस जुना राजवाडा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या 24 दुचाकी जप्त केल्या. अलंकार बाबुराव पाटील (वय. 21 सावे ता. शाहुवाडी), अमर निवास खामकर (वय. 25 रा. साखरे गल्ली, मलकापूर ता. शाहूवाडी), करण विठ्ठल शिंदे, सुशांत चंद्रकांत गायकवाड, सुशांत बबन कांबळे, अभिषेक उर्फ आबा सपाटे अशी त्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. याचा अभ्यास करुन पोलिसांनी ज्या ठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी वेशांतर करुन सापळा रचला. गुरुवार (16 जून) पोलीस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे यांच्यासह त्यांच्या पथकाने अंबाई टँक परिसरात सापळा रचला. यावेळी विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरुन दोघेजण तेथे आले. त्यांनी रस्त्याकडेला पार्क केलेल्या मोटारसायकलची रेकी सुरु केली. मोटारसायकलचे हॅडलही चेक करु लागले. मात्र पोलिसांनी सापळा रचल्याची कुणकुण त्यांना लागताच दोघांनी दुचाकीवरुन पलायन करण्याचे प्रयत्न केले. यावेळी पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेण्यात आले. प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर सखोल चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील 10, शाहुपुरीतील 5, लक्ष्मीपुरीतील 5, कळे, गांधीनगर येथील 1 यासह इतर 3 मोटारसायकल जप्त केल्या.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक अभिजीत इंगळे, उपनिरीक्षक संदिप जाधव, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, संदिप माने, सतिश बांबरे, प्रितम मिठारी, अमर पाटील, संदिप पाटील, योगेश गोसावी, संदिप बेंद्रे, गौरव शिंदे, नितीश कुराडे, तुषार भोसले, उत्तम गुरव यांनी ही कारवाई केली.

खासगी कंपनीत कामाला जाताना दुचाकी वर हात
अलंकार पाटील हा मार्केट यार्ड परिसरातील एका कंपनीमध्ये कामाला होता. तर अमर एका लॅबमध्ये कामास आहे. ते दोघे दररोज गावाकडून एकाच दुचाकीवरुन ये जा करत असत. कंपनीतील काम आटोपल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी असणाऱया दुचाकीवर हात साफ करत होते. चोरी केलेल्या दुचाकी करण शिंदे सुशांत गायकवाड, सुशांत कांबळे, अभिषेक उर्फ आबा सपाटे यांच्याकडे विक्रीसाठी दिल्या जात असत. काही दुचाकींचे सायलेंन्सर जास्त किमतीला विकले जात असत. तर काही दुचाकी ग्रामीण भागात कमी किंमतीमध्ये विकल्याचे समोर आले आहे.

तपास पथकास 20 हजारांचे बक्षीस
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास 20 हजारांचे बक्षीस जाहिर करण्यात आले. शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी 10 हजार तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी 10 हजारांचे बक्षीस तपास पथकास जाहिर केले.

Related Stories

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या चारचाकीला अपघात

Abhijeet Shinde

मोहरे येथे अज्ञात वहानाच्या धडकेत मांगलेतील तरूण ठार

Abhijeet Shinde

वर्ल्ड स्कूल गेममध्ये नाधवडेच्या राजवर्धन पाटीलने घडविला इतिहास

Abhijeet Khandekar

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठ वाहतूक कोंडीचे नियोजन करा

Abhijeet Shinde

कुरुंदवाड ९ जुलैपर्यंत लॉकडाऊन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : खुपिरे रुग्णालयाला ऑक्सीजन निर्मितीसाठी पन्नास लाखाचा निधी : आ. पी. एन. पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!