kolhapur Bison News : कोल्हापूर शहरात पुन्हा गवारेडा येण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी सहा गव्यांचा कळप कोल्हापूराच्या वेशीवर आठ दिवस मुक्कामाला होता. आज पुन्हा रमणमळा येथील विलासराव पोवार यांच्या उसाच्या शेतात गव्याचा कळप स्थानिकांनी पहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही भागात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रमणमळा येथील विलासराव पोवार यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. आज सकाळी गव्यांचा कळप पोवार यांच्या शेतात घुसला. शेतात गवे घुसताच शेतमजूरांनी त्यांना हुसकावून लावण्य़ाचा प्रयत्न केला. यावेळी हे गवे त्या कामगारांच्या अंगावर धावून गेल्याची स्थानिकांनी सांगितले. याआधी पंधरा दिवसापूर्वी सहा गव्याचा कळप कोल्हापूराच्या वेशीवर आठ दिवस मुक्कामाला होता.वन विभागाच्या शोध मोहिमेनंतर देखील त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.मात्र पुन्हा एकदा गवारेड्याने कारदगा मळ्यात स्थानिकांना दर्शन दिले.त्याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. गव्याचा कळपाने स्थानिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


previous post