फुलेवाडीत पुण्यस्मरणानिमित्त घेतले रक्तदान शिबिर
प्रतिनिधी/कोल्हापूर
‘सीपीआर’ रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याची प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झालेल पोस्ट पाहून अनेक हात रक्तदानासाठी पुढे सरसावले. फुलेवाडी येथील टेंबलाई मंदीर परिसरातील कसबेकर हॉल येते कै. आनंदा सोमा राणे यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
‘सीपीआर’ रक्त पिढीच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पुण्यस्मरणा निमित्त एक विधायक उपक्रम राबवावा या हेतूने हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक नातेवाईक, मित्रपरिवाराने उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा उपक्रम पार पाडण्यासाठी वसंत केसरकर, तानाजी गडदे, प्रदीप तानुगडे, दिग्विजय देसाई, अमर पाटील, सुनिल डोंगळे, सुनील जाधव, अविनाश पाटील, रंगराव केसरकर, विलास केसरकर, संदीप बेलेकर, प्रशांत केसरकर, सुनील दळवी, सचिन दळवी, सौरभ केसरकर, दीपक राणे, अनिल पाटील आदींने प्रयत्न केले.