Tarun Bharat

KOLHAPUR BREAKING-पन्हाळा तालुक्यात पिंपळे-आळवेत स्कुलबसचा अपघात, विदयार्थी किरकोळ जखमी,सुदैवाने जीवितहानी टळली

Advertisements

पन्हाळा (कोल्हापूर)– विदयार्थ्यांना शाळेला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. स्कुलबस रस्त्यावरून घसरून बाजूच्या शेतात पलटी झाली. या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना खासगी व प्राथमिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी हे कोतोली येथील के. एस. चौगुले शाळेचे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील के. एस. चौगुले शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्कुलबस वाघवेकडून आळवे पिंपळे गावात आली. तिथले विद्यार्थी घेऊन हि बस कोतोलीकडे जात होती. दरम्यान, या मार्गावर रस्त्याचा कडेला जाऊन हि बस बाजूला शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. हि घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. हि घटना समजल्यानंतर पालकांनी शाळेत व रुग्णालयात गर्दी केली.

Related Stories

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

Abhijeet Shinde

रहिमतपूर-सातारा अवैध दारु कनेक्शन उद्ध्वस्त

Patil_p

अर्जेंटीनाचं २८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण; गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ

Abhijeet Shinde

कर्नाटक हिजाब प्रकरणी तत्काळ सुनावणीस SC चा नकार

Abhijeet Shinde

आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत, आशिष शेलारांचे राऊतांना जाहीर आव्हान

Rahul Gadkar

बोरपाडळे घाटात स्कोडा कारने पेट घेतल्याने एकाचा जळून मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!