Tarun Bharat

ग्रामीण भागातील बसेसचा पुढील 10 दिवसांत निर्णय होणार


Kolhapur News : हद्दवाढ कृती समितीनं शहरासह ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस आज सकाळी रोखल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला. त्यामुळे शहर बससेवा पहाटेपासून दुपारी साडे बारापर्यंत विस्कळीत झाली. दुपारी साडे बाराच्या सुमारास समितीकडून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. महापालिका अधिकारी व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मुडशिंगी व येवती हे दोन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ग्रामीण भागातील बसेसचा पुढील 10 दिवसांत निर्णय होणार

पहिल्या टप्प्यात दोन मार्गांवरील बससेवा बंद झाली असली, तरी ज्या मार्गांवर बस तोट्यामध्ये धावत आहेत त्या मार्गांवरील निर्णय येत्या 10 दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाकडून याबाबत आश्वासन देण्यात आल्यानंतर हद्दवाढ कृती समितीकडून आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी कृती समिती पदाधिकारी व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये बैठक होणार आहे. 

कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांमध्ये केएमटी बस सेवा देऊ नये, ग्रामीण भागातील तोट्यातील मार्ग बंद करावे यासाठी कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.”

Related Stories

कोल्हापूर : गोपाळराव पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Archana Banage

कोल्हापूर : प्रवासी, मालवाहू वाहनांचा ६०० कोटींचा होम टॅक्स माफ

Archana Banage

जम्मू काश्मीर : डोडा भागात जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

कुरकुरे खाऊन मेले रंकाळ्यातील पानबदक

Archana Banage

मोदींचे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना अदानी अंबानीच्या दावणीला बांधण्याचे षडयंत्र : राजू शेट्टी.

Archana Banage

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद

Archana Banage
error: Content is protected !!