Tarun Bharat

5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

ऑनलाईन टिम नवी दिल्ली

5G स्पेक्ट्रमच्या (5G Spectrum ) लिलावाला मंत्री मंडळाने मंजूरी दिली असून त्याच्या स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलैपासून सुरू होत आहे. दूरसंचार विभागाने यासंबंधी अर्ज मागवण्याच्या परिपत्रकामध्ये सूचना केल्या आहे. मंत्रिमंडळाने बुधवारी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. एअरवेव्हचा हा लिलाव २० वर्षांच्या कालावधीसाठी असेल.

या स्पेक्ट्रमसाठीचा लिलाव विविध लघू आणि उच्च (600 MHz पासून 2300 MHz पर्य़ंत), मध्य (3300 MHz) आणि उच्च (26 GHz इट) बँडमध्ये होणार आहे. लिलावासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 8 जुलै आहे. दूरसंचार विभाग 12 जुलै रोजी अर्जदारांच्या मालकीचे तपशील प्रकाशित करेल. निविदाकारांची अंतिम यादी 20 जुलै रोजी थेट होऊन जुलै रोजी तोंडी लिलाव होईल.

मंत्रिमंडळाने ‘खाजगी नेटवर्क्स’चा विकास आणि स्थापना सक्षम करण्याचा निर्णयही यामध्ये घेतला. मशिन-टू-मशीन कम्युनिकेशन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा ऑटोमोटिव्ह, आरोग्यसेवा, कृषी, ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे वापर करण्यात येऊ शकेल.

Advertisements

Related Stories

“आता माझा एककलमी कार्यक्रम…”, मुंबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांचा इशारा

Abhijeet Shinde

कोवाड बाझारपेठ आठवडाभर बंद

Abhijeet Shinde

इचलकरंजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दीपक पाटील यांच्याकडे

Abhijeet Shinde

”रशियासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बायडेन नाराज”

Sumit Tambekar

हाफिज सईदसह पाच जणांची बँक खाती सुरू

datta jadhav

ऑस्ट्रेलियात भारतीय विमानांना ‘नो एन्ट्री’

datta jadhav
error: Content is protected !!