Tarun Bharat

‘अधिकाऱ्यांना फोन करा’ हा तर बनावट संदेश : महावितरण

वीजग्राहकांनी दुर्लक्ष करण्याचे महावितरणचे आवाहन

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, हातकणंगलेसह काही भागात नागरिकांना वीज बिल भरण्यासंदर्भाने बनावट ‘एसएमएस’ प्राप्त झाल्याचे समजते. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा’, अशा आशयाचे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना वेगवेगळ्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावरून प्राप्त आहेत. वीजग्राहकांनी अशा बनावट संदेशाना प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येते आहे.

महावितरणकडून वीजग्राहकांना प्रणालीद्वारे केवळ नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा संदेशक (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. महावितरणकडून अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही.

महावितरणकडून वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठवा, मीटर रिडींग तारीख व वापर वीज युनिट संख्या, वीजबिल रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडितची नोटीस इ. माहिती पाठविण्यात येते.

वीजग्राहकांनी बनावट संदेशातील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधणे, वीज बिल भरण्यासाठी लिंक पाठविली असल्यास त्यावर क्लिक करणे टाळावे, अन्यथा आर्थिक फसवणूक होऊ शकते. आपल्या शंका व तक्रारी करीता २४ तास सुरु असलेल्या १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

Related Stories

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना धक्का, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश

Abhijeet Khandekar

पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार कंपन्यांना टाळे ठोका; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Archana Banage

‘विश्वास नांगरे पाटील’ यांनी घेतली सलमान खानची भेट

Nilkanth Sonar

राम नवमी निमित्त शहरात उद्या शोभा यात्रेचे आयोजन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : राजारामपुरी पोलिसांकडून विनाकारण झालेल्या मारहाणीची चौकशी करावी

Archana Banage

काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातल्याची चर्चा; थोरात म्हणाले…

Archana Banage
error: Content is protected !!