कोल्हापूर प्रतिनिधी
फेब्रुवारी 2006 मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून राष्ट्रगीताच्या झालेल्या अवमानाबद्दल मेजर संजय शिंदे यांनी फौजदारी न्यायालयात दाखल केलेला दावा आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या 8 सप्टेंबर रोजी या दाव्यातील महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
या खटल्याची सुनावणी मे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-1 वर्मा यांच्या न्यायालयात सुरू आहे. मेजर संजय शिंदे यांनी 56 पुरुष नगरसेवकांचे विरुद्ध फौजदारी न्यायालयात दाद मागितली होती. त्यातील पाच नगरसेवकांचे निधन झाल्याने आता हा खटला 51 माजी नगरसेवकांच्या विरुद्ध चालू आहे. हे सर्वच्या सर्व नगरसेवक तारखेस गैरहजर असल्यामुळे मे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-1 वर्मा यांनी सर्व 51 आरोपी नगरसेवक विरुद्ध प्रत्येकी पाच हजार रूपयांचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचा हुकूम जारी केला आहे. पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. या खटल्यात फिर्यादी मेजर संजय शिंदे यांच्या वतीने ऍड. रणजितसिंह घाटगे काम पाहत आहेत.