Tarun Bharat

मराठा महासंघाच्या ज्येष्ठ आघाडी जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण

कोल्हापूर प्रतिनिधी

मराठा महासंघाच्या ज्येष्ठांच्या आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. याआधी हे पद डॉ. शिवाजीराव हिलगे भूषवित होते. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सर्व कार्यकारणी व पदाधिकारी यांचे उपस्थितीत एकमताने चव्हाण यांची निवड जाहीर केली.

चंद्रकांत चव्हाण गेली अठरा वर्षे मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा समाजाचे कार्य करत आहेत. विविध आंदोलने, कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मराठा महासंघाच्या कोल्हापूर शहर संघटक ते जिल्हा संघटक पदापर्यंत काम केले आहे. गायक आणि कवी असणाऱ्या चव्हाण यांनी यापूर्वी संगीतकार अरविंद पोवार, ब्रदर्स, ड्रीम मेकर्स, हेमलता, कै.जगदीश खेबूडकर यांच्या ऑपेस्ट्रा व संगीत रजनी कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मुकेश म्हणून गायन केले आहे. पर्यावरण चळवळीतही ते कार्यरत आहेत. शहरातील झाडे जगविण्याच्या मोहिमेत त्यांचा सहभाग असतो. वृक्षमित्र म्हणूनही त्यांना ओळखले जाते. या निवडीसाठी त्यांना जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मारुती मोरे, शैलजा भोसले, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, अवधुत पाटील, यांचे सहकार्य लाभले.

ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनावर भर देणार
दरम्यान, निवडीनंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत चव्हाण म्हणाले, मराठा महासंघाने ज्येष्ठांची जबाबदारी दिली आहे. ज्येष्ठांचे संघटन करणे, त्यांचे उतार वयातील प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करणे. तसेच शासन दरबारी त्याचे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणुकीसाठी मी प्रयत्न करणार आहे.

Related Stories

करवीर गर्जनेने दुमदुमली करवीर नगरी; गुढी पाडव्या निमित्त शहरात भव्य शोभा यात्रा

Abhijeet Khandekar

मुबलक पाणी द्या अन्यथा आम्ही नळास मोटरी लावणार

Archana Banage

कोल्हापूर : गोकुळसाठी शक्तीप्रदर्शनाने ९९.७८ टक्के मतदान

Archana Banage

कोल्हापूर : सीपीआरमध्ये सोमवारी सांयकाळी ऑक्सिजन टँकर दाखल

Archana Banage

पोलिसांनी करुन दाखविले

Kalyani Amanagi

Kolhapur : थेट मुख्यमंत्री आणि थेट पंतप्रधानही जनतेतून निवडा- अजित पवार

Abhijeet Khandekar