Tarun Bharat

दीपावलीनिमित्त गांधीनगर बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी गर्दी; उद्यापासून वाहतूक, पार्किंगमध्ये बदल

उचगाव/ प्रतिनिधी

दीपावली सणानिमित्त गांधीनगर बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दि.१६ ते दिनांक २७ अखेर गांधीनगर पोलिसांनी गांधीनगर मुख्य रस्त्यावर जड, अवजड व मध्यम वाहतूक करणाऱ्या मोटर वाहनांना आतील भागात प्रवेश व माल चढउतार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यातून अत्यावश्यक सेवेतील तसेच ग्रामपंचायत सेवेतील वाहने वगळण्यात आलेली आहेत, अशी माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याची साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी दिली.

गांधीनगर ता. करवीर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापडाची, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, इतर सजावटीकरण वस्तू आदी व्यापाऱ्यांची होलसेल व रिटेल व्यापार पेठ आहे. दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करिता महाराष्ट्र, गुजरात ,कर्नाटक आदी राज्यातून व्यापारी व ग्राहक हजारोंच्या संख्येने आपल्या वाहना सह गांधीनगर येथे ते जा करतात. व्यापारपेठेत येण्यासाठी एकच मुख्य रस्ता असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत बदल
करण्यात आले आहेत.

अवजड, जड मध्यम मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

दि.१६ ते २७ अखेर सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत तनवाणी कॉर्नर पासून गांधीनगर कडे (केएमटी व शासकीय वाहन तसेच ॲम्बुलन्स खेरीज) सर्व चार चाकी, मालवाहतूक करणारे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.गणेश टॉकीज ते वळिवडे (ट्रान्सपोर्ट लाईन) रोड दरम्यान चार चाकी वाहनांना बंदी करण्यात येत आहे. रिक्षा, मिनी टेंम्पो यांना वळिवडे, चिंचवाड गावात जाणारे येणाऱ्या नागरीकांकरिता गणेश टॉकीज पासून उत्तरेस कोयना कॉलनी मार्गे सरकारी दवाखाना वगैरे असा मार्ग राहील.

जड व मध्यम माल वाहतूक करणाऱ्यां वाहनांना पर्यायी मार्ग
गांधीनगर ट्रान्सपोर्ट लाईन मधील वाहनांना ते जा करण्यासाठी पर्यायी मार्ग तावडे हॉटेल उचगाव फाटा गडमुडशिंगी चिंचवाड मार्गे गांधीनगर असा राहील. ट्रान्सपोर्ट लाईन मधून गांधीनगर बाजारपेठेत व्यापाऱ्यांना माल देणे घेणे करिता सर्वच चार चाकी मिनी टेम्पो रिक्षा यांना रात्री दहा ते दुसरे दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत या वेळेत व्यापारपेठेत जाण्यास परवानगी राहील.

दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता निश्चित करण्यात आलेली पार्किंग
चार चाकी व दुचाकी वाहना करिता आशीर्वाद दुकानासमोर केसरकर पार्किंग, किनारी साडी सेंटर मागे, पोवार मळा, लोहिया मार्केट मागे, (पेट्रोल पंपासमोर) या ठिकाणी वाहनतळ पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक नियोजनाबाबत ग्रामस्थ, व्यापारी ग्राहक तसेच मोटर वाहन चालक यांनी सहकार्य करावे असे आवाहन गांधीनगर चे साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्येही पुईखडी येथे घोडागाडी शर्यती

Archana Banage

शाहूवाडी तालुक्यात खरीप पेरण्या पुर्ण; बळीराजा मान्सूनच्या प्रतीक्षेत

Archana Banage

पन्हाळा तालुक्यातील कोडोली, देवाळेत दोघांची आत्महत्या

Archana Banage

पुणे, कोल्हापूरकरांसाठी म्हाडाची खूशखबर, पहा काय आहे आनंदवार्ता…

datta jadhav

लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

Abhijeet Khandekar

सीपीआर मधील लिपीक लाचलुचपतच्या जाळयात

Archana Banage