माजी सरपंचासह दोघे जखमी; दोन्ही गटातील सव्वाशेहून अधिक जनावर गुन्हा
वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली (ता.पन्हाळा) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मिरवणूक बंद करण्यावरून झालेल्या वादातून दोन गटात झालेल्या मारामारीत कोडोलीचे माजी सरपंच यांच्या सह दोघे जखमी झाले आहेत. या बाबत दोन्ही गटाकडून एकमेका विरुद्ध झालेल्या तक्रारीवरून एकूण चोपन्न व अनोळखी ऐशी जणांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माजी सरपंच नितीन कापरे, पृथ्वीराज पोपट मगदूम, तुषार बंडु माने अशी जखमींची नावे आहेत. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवार दि.१५ रोजी कोडोलीतील सी.के.तालीम मंडळांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून मिरवणूक काढली होती. काढलेली मिरवणुक शिवाजी चौकाकडुन मेन रोडने सर्वोदय चौकाकडे जात असताना मिरवणुक किबीले गल्ली जवळ आलेवर या दोन गटात वाद झाला. या वादात दोन्ही गटात काठ्यानी, लोखंडी रॉडने व दगड फेक करून जखमी केलेबाबत परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यातील नितीन कापरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सी. के.तालीम मंडळाचे कार्यकत्यांचे सुरु असलेल्या मिरवणुकीतील वाद कापरे गल्लीतील लोकांनी सोडविलेचा राग मनात धरून मंडळातील कार्यकर्त्यांचा एक जमाव येऊन गल्लीतील लोकांना काढ्यानी, लोखंडी रॉडने व दगडफेक करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर त्या विरोधात पृथ्वीराज पोपट मगदुम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरवणुक किबीले गल्ली जवळ आलेवर किबीले गल्लीतील एका गटाने सि . के तालीम यांचे कार्यक्रत्यांना मिरवणुक बंद करून जावा गाणे लावायचे नाहीत असे म्हणाले असता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध केला असता विरोधी गटातील एक जमाव हातातून काठ्या, लोखंडी रॉड व दगड घेवून सि.के तालमीच्या गटावर हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेका विरुद्ध झालेल्या तक्रारीवरून एकूण चोपन्न व अनोळखी ऐशी जणांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांच्या पथकातील फौजदार नरेंद्र पाटील, सागर पोवार यांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या गोष्टीचे गांभीर्य ओळखुन शाहूवाडी विभागाचे पोलीस उप अधीक्षक रवींद्र साळोखे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन भेट दिली.आज दिवसभर कोडोलीत या घटनेची चर्चा सुरू आहे.