Tarun Bharat

Kolhapur; कुंभोज मोहरमची सांगता; शाही मशिदपासुन मानाच्या सवाऱ्यांची विसजन मिरवणूक संपन्न

कुंभोज प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या मोहरमच्या आजच्या शेवटच्या दिवशी ताबूत विसर्जन कार्यकम अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कुंभोज गावात 14 ते 15 ठिकाणी बसणाऱ्या सर्व मानाच्या सवार्या मसुदी कट्टा शाही मशिद येथे शेवटच्या भेटीसाठी आल्या. सदर ठिकाणी बुरुज व करबलचे मैदानी खेळ झाले.

परिणामी सदर ठिकाणी मसूदिकट्टा शाही मशिदीच्या वतीने कार्यक्रमाची जलद तयारी करण्यात आली होती. चार नंतर सदर ठिकाणी गावातील सर्व मानाच्या सवाऱ्या एकत्रित येण्याला सुरुवात झाली. परिणामी मानाच्या बसणाऱ्या सर्वच सवारींच्या गादीजवळ करबल व मोहरमच्या सांगता समारंभाचा धार्मिक विधी कार्यक्रम झाला. सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या धार्मिकतेने उपस्थित झाले होते.

सायंकाळी सहानंतर भव्य अशा ढोल ताशांच्या गजरात व अबीर बुक्क्याच्या उधळणीने सदर मोहरमची सांगता मिरवणूक मसुदी कट्टा ते दीपक चौक इथून निघाली. सदर मार्गावरती मिरवणुकीची पूर्ण तयारी करण्यात आली होती अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी सरबत पाणी व काही ठिकाणी नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. सदर मोहरमचा शेवट हजरत शहाकताल साहेब दर्गा येथे झाले. हातकणगले पोलीस स्टेशनच्या वतीने ही सदर मिरवणूक ठिकाणावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Stories

निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा सोमवारी बंद

Archana Banage

मृत्यूनंतरही त्यांने दाखवली घट्ट मैत्री

Archana Banage

कोल्हापूर : ऑक्सिजनची ६० टक्के निर्मिती जिल्हयातच

Archana Banage

Sangli : स्वच्छतागृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Kalyani Amanagi

करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

Archana Banage

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीला प्रारंभ

mithun mane