पावसामुळे हरकतींचे निरसन करण्यास अडथळा येत असल्याने निर्णय; 16 जुलै रोजी अंतिम यादी होणार जाहीर
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिका निवडणूकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. परंतू मोठया संख्येने आलेल्या हरकती आणि अतिवृष्टीमुळे जागेवर जावून पाहणी करून त्या निरसण करण्यास येत असलेल्या अडचणीमुळे राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीला मुदत वाढ दिली आहे. आता 16 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
अधिक वाचा- इचलकरंजी महापालिकेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. प्रभाग रचना, आरक्षणही टाकण्यात आले आहे. आता मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 23 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. अनेक प्रभागातील मतदार यादीमध्ये घोळ झाला आहे. दुसऱया प्रभागात मतदारांची नोंद झाली आहेत. तर शिंगणापूर येथील मतदार फुलेवाडीच्या यादीत समावेश झाले आहेत. 3 जुलैपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत होती. 308 हरकती दाखल झाल्या आहेत. बीएलओ, सुपरवायझर, सर्व्हेअर यांच्यामार्फत दाखल हरकतीनुसार थेट जाग्यावर जावून शहानिशा केली जात आहे. तीन दिवसांपासून शहरामध्ये मुसळधार पावसामुळे हरकतींचे निरसन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. पुढील तीन दिवस रेड अलर्ट आहे. मोठया संख्येने आलेल्या हरकती आणि पावसाचा अडथळा यामुळे 9 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादीचे कामकाज पूर्ण होणे अशक्य होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीला मुदत वाढ दिली आहे. आता 13 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
बीएलओंना दिलासा
महापालिका निवडणूकीसाठी मतदार यादी, प्रभाग रचनाचे काम दोन वेळा करण्याची वेळ आली. याचा सर्वाधिक त्रास बीएलओंना झाला. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्येही मोठय़ा संख्येने हरकती आल्या आहेत. त्या निरसन करण्याच्या कामासाठी भर पावसात प्रभागामध्ये बीएलओंना फिरावे लागत होते. शिवाय मनपा प्रशासनाने दोन दिवसांत हरकतींचे निरसण करण्याचे आदेश होते. आता अंतिम मतदार यादीला मुदत वाढ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे