Kolhapur Crime News : मालमत्तेच्या वादातून वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न पोटच्या मुलाने केला आहे. वडील शौचालयास गेल्याचे पाहून मुलाने पत्नीच्या मदतीने हे कृत्य केले.घटनेत वडील जखमी झाले आहेत. त्य़ांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवबा हजारे असे जखमी वडिलांचे नाव आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना कागल तालुक्याच्या व्हन्नूर गावात घडली. या प्रकरणी शिवाजी देवबा हजारे व सरला शिवाजी हजारे या संशयितांविरूध्द कागल पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जखमी देवबा हजारे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्दीनुसार, व्हन्नूर येथील देवबा हजारे आणि त्यांचा मुलगा शिवाजी हजारे यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.दोघात सतत भांडणे सुरु होती. काल सकाळी देवबा हे शौचालयात गेले होते. हे पाहून त्यांच्या मुलाने शौचालया बाहेर पेट्रोल टाकून ते पेटविले. वडिल बाहेर येवू नयेत म्हणून त्याने बाहेरून कडी लावली. यात देवबा जखमी झालेत. तुला आता जिवंत जाळल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीही शिवाजीने दिली. तर त्याच्या पत्नीने त्य़ांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर शिवाजी पळून गेला आहे. तर या दोघा पती-पत्नींविरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


previous post
next post