Tarun Bharat

महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा प्रयत्न फसला, गुंगीचा स्प्रे मारून घंटन पळवण्याचा केला प्रयत्न पण…

Kolhapur Crime News : गाडीत बसलेल्या महिलेच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून गळ्यातील घंटन पळवण्याचा प्रयत्न गाडी चालकाने केला. परंतु त्या महिलेच्या प्रसंगावधानाने चालकाचा प्रयत्न फसला अन् चालकांने तात्काळ पलायन केले. हि घटना शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास निपाणी- राधानगरी रस्त्यावर उंदरवाडी गावाजवळ घडली. घटनेची माहिती उंदरवाडीचे पोलिस पाटील हिंदुराव परीट यांनी मुरगुड पोलिस ठाण्यात दिली आहे.

घटनास्थळी मुरगुड पोलिस नाईक जयसिंग पाटील व पोलीस कॉन्स्टेबल संदीप लाड यांनी तात्काळ उपस्थिती लावून सदर गुन्हयाचा तपास केला असता प्राथमिक अंदाजानुसार मिळालेली माहिती अशी, नरतवडे ता राधानगरी येथील सौ. रेखाताई अशोक गुरव या आपली आई आजारी असलेने कोनवडे ता. भुदरगड येथे गेल्या होत्या. आईला बघून मुदाळ तिट्यावरून क्रुझर गाडी नं.एम.एच.१२ आर.टी.७६७३ ही गाडी वडापची समजून त्या गाडीत बसल्या होत्या. त्यांच्या सोबत उंदरवाडी गावच्या दोन महिला देखील गाडीत बसल्या होत्या. ही गाडी उंदरवाडी पाटीजवळ आल्यावर त्या दोन महिला उतरल्या.

रेखा गुरव या एकट्या गाडीत होत्या. सदरची गाडी उंदरवाडी पाटीच्यापुढे सरवडे गावाजवळील पहिल्या वळणावर आल्यावर अज्ञात क्रुझर गाडी चालकांने महिलेच्या अंगावर स्प्रे मारून गंठन हिसकवण्याचा प्रयत्न केला. परंतू सावध महिलेने गाडीतून हात काढून जोरात आरडाओरडा केला. महिलेने आरडाओरडा सुरू केल्याने गाडी चालकाचा स्टेरिंगवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याकडेला जावून थांबली. त्यानंतर चालकांने घाईगडबडीने पलायन केले. या रस्त्यावर रहदारी असल्याने महिलेचा आरडाओरडा ऐकून अनेक वाहन चालक थांबले परंतु रात्रीच्या अंधारात चालक पळून गेल्याने त्याला शोधणे अवघड झाले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, सदर क्रुझर गाडी एका खाजगी कंपनीकडे भाड्याने आहे. व तो चोरी करणारा अज्ञात इसम त्या गाडीवर चालक आहे. गाडीचा मालक मुरगुड परिसरातील असल्याचे समजते. निपाणी-राधानगरी या मोठी रहदारी असणार्‍या रस्त्यावर हि घटना घडल्याने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

दत्तक प्रकरणी मुलग्याचा बापासह तृत्तीयपंथी, वकील, डॉक्टर दोषी

Archana Banage

उचगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट विमानातून तिरुपती दर्शन

Abhijeet Khandekar

शाहूवाडी मलकापूरात काही अंशी शिथिलता

Archana Banage

अवंतीपोरात ‘जैश’च्या टॉप कमांडरचा खात्मा

datta jadhav

राष्ट्रवादीकडून भाजपला मदत; लवकरच परिणाम दिसतील; पटोलेकडून सूचक विधान

Rahul Gadkar

मुलांच्या लसीची तयारी : लस चाचणीचे निकाल सप्टेंबरपर्यंत येणार

Tousif Mujawar
error: Content is protected !!