Tarun Bharat

पाचगावात रोख रकमेसह दागिने चोरट्यांने केले लंपास

Advertisements

पाचगाव वार्ताहर

भैरवनाथ कॉलनी पाचगाव येथे बंद घराचे कुलूप उचकटून रोख पाच लाख रुपये रकमेसह अडीच तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
भैरवनाथ कॉलनी पाचगाव येथील निरंजन बाबुराव सनगर हे आपल्या कुटुंबीयांसह शनिवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेर गावी गेले होते .चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील अंदाजे पाच लाख रुपयांच्या रकमेसह अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले .
निरंजन सनगर हे सोमवारी दुपारी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत करवीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे .करवीर चे डी वाय एस पी संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली .तसेच श्वानाच्या सहाय्याने ही चोरट्यांचा माग घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. अधिक तपास करवीर पोलिस करत आहेत .

Related Stories

नियम पाळून सोमवारी कोल्हापूर जिल्हातील दुकाने उघडणार

Abhijeet Shinde

राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत का ?- चंद्रकांतदादा पाटील

Sumit Tambekar

कोल्हापूर : शिवाजी पालखेंमुळे कुंभोज गावचे नाव मंगळावर कोरले जाणार

Abhijeet Shinde

छत्रपती शिवराय सामर्थ्यशाली राजे : पालकमंत्री

Abhijeet Khandekar

गॅस सिलिंडरचे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करा

Abhijeet Shinde

कोल्हापुरात १० कार फोडल्या, राजवाडा पोलिसांनी स्वप्नील तावडे या युवकाला घेले ताब्यात

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!