Tarun Bharat

Kolhapur; सातेरी-महादेव डोंगरावर भाविकांची गर्दी; श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य

कसबा बीड / प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील महादेव सातेरी मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली. भाविकांच्या आगमनाने डोंगर परिसर गर्दीने फुलला होता. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने पंचक्रोशीतील कोगे, महे, कसबा बीड ,गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला व बारा वाड्या या गावातील भाविकांनी पायी चालत जाऊन शंभू महदेवाचे दर्शन घेतले.

सातेरी महादेव डोंगरावर ‘ हर हर महादेव’ चा गजर घुमत होता. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी यायला सुरुवात झाली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोरोना काळात दोन वर्षे सातेरी महादेव डोंगरावर महाशिवरात्री उत्सव, श्रावण सोमवारनिमित्त दर्शन बंद होते. कोरोनाचे संकट टळल्यामुळे यावेळी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत त्यामुळे मोठा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत होता. डोंगरावर पूजेचे साहित्य तसेच खाऊपासून ते विविध प्रकारची खेळणी आणि इतर वस्तूंच्या दुकानांनी यात्रेचे स्वरूप आले होते. सायंकाळपर्यंत उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची ये- जा सुरु होती.

बाराव्या शतकातील प्राचीन ऐतिहासिक महत्व जपणाऱ्या करवीर तालुक्यातील सातेरी महादेव निसर्ग रम्य परिसरात आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्ह्यातील महादेव भक्तांनी रवीवारी रात्री व आज सकाळी पासून दर्शना साठी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी महाशिवरात्री तसेच आठवड्यातील दर सोमवारी येथे भाविकांची गर्दी होत असते. यावेळी महादेव चारिटेबल ट्रष्ट यांच्याकडून नागोबाची मुर्ती महादेव मंदिरास अर्पण करण्यात आली. ही नागोबाची मुर्ती तीन किलोमीटर अंतर चालत भाविकांनी वाजत गाजत आणली.
सातेरी महादेव मंदिर शेजारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीर पोलिस स्थानकांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

Related Stories

सातबाऱ्यावर आता ‘भू आधार क्रमांक’

Archana Banage

गोकुळ निवडणूक प्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Archana Banage

विधान परिषद : राजू शेट्टी पुन्हा महाविकासआघाडी सोबत

Abhijeet Khandekar

आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक; प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

राजर्षी शाहू महाराज अन् सर विश्वेश्वरय्या !

Archana Banage

11 हजार 541 मेट्रीक टन आंब्याचा लिलाव

Patil_p