Tarun Bharat

जोतिबावर भाविकांची अलोट गर्दी

चौथ्या दिवशी आकर्षक रोषणाईसह सजला परिसर, जोतिबाची पाच पाकळ्य़ातील सुवर्णालंकारित खडी महापुजा

Advertisements

जोतिबा डोंगर/वार्ताहर

जोतिबा डोंगर येथील मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवातील चौथा दिवस भाविकांच्या प्रचंड गर्दीत उत्साही व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. आज चौथ्या दिवशी जोतिबाची सोहन कमळातील पाच पाकळ्यांतील सुवर्णालंकारित खडी आकर्षक महापुजा बांधण्यात आली. देवस्थान समितीतर्फे जोतिबा मंदिराच्या सर्व शिखरावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे, ही रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविक भक्तांची दर्शनासाठी पहाटेपासूनच तुफान गर्दी झाली होती.

गुरुवारची श्री जोतिबा देवाची महापुजा शिवाजी बनकर ,महालिंग शिंगे ,मधुकर सांगळे, उत्तम भिवदरणे, पिंटू सांगळे, आकाश ठाकरे, दगडु भंडारी, श्री चे पुजारी देवराज मिटके, महादेव झुगर, हरिदास सातार्डेकर,अमर नवाळे, अंकुश दादरणे, विनोद मिटके, गजानन लादे यांनी बांधली. तसेच काळभैरव, यमाई, चोपडाई, नंदी, महादेव, रामलिंग या देवाची महापुजा खंडकरी गृप व दहा गावकर प्रतिनिधी यांनी बांधली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे जोतिबा व यमाई मंदिराच्या तसेच सर्व देवांच्या शिखरावर व दिपमाळा, महादरवाजे, तसेच सर्व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणामुळे सर्व परिसर उजळून निघाला आहे.

Related Stories

Kolhapur : क्राईम ब्रॅंचच्या पथकांकडून पुलाची शिरोलीमध्ये प्रतिज्ञा पञांची चौकशी

Abhijeet Khandekar

२०१४ पासून देशाची समता बिघडली; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

Archana Banage

कोल्हापूर : पै.लव्हाजी साळुंखेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Archana Banage

‘त्या’ जखमी वृद्धाला मिळाला मानवतेचा आधार

Archana Banage

कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतीत तरुण उद्योजकाची आत्महत्या

Archana Banage

सावरवाडी येथे ऊस शेतीस आग; अडीच लाखाचे नुकसान

Archana Banage
error: Content is protected !!