शिष्टमंडळाने केली शिक्षण उपसंचालक चोथे यांचेकडे मागणी!
पुलाची शिरोली / वार्ताहर
येथील आर्यन बुडकर या विद्यार्थ्याच्या आत्यहत्या प्रकरणी सिम्बॉलीक स्कूलच्या दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांचेकडे शिष्टमंडळानी केली.
सिम्बॉलीक स्कुलवर कारवाई प्रक्रियेची सद्यस्थिती याची विचारणा करण्यासाठी सोमवारी शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी श्री. चोथे यांनी त्यासंबंधीचा अहवाल तयार झाला आहे व लवकरच नियमानूसार आढावा घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात रामचंद्र बुडकर, कॉम्रेड गिरीश फोंडे, प्रशांत कागले, राम करे, संदीप जाधव आदींचा समावेश होता.