Tarun Bharat

आमचा देश कृषिप्रधान आहे ?

Advertisements

ऑनलाईन टिम : तरूण भारत

आपण नेहमीच अशा बातम्या ऐकत आणि वाचत आलो आहे आपल्याला या गोष्टी नव्या तर आजिबात नाहीत जे आपल्या पूर्वजांनी भोगलं सोसलं आणि जगले अगदी आपणही तसेच मरण येत नाही तोवर जगायचं आणि हे सगळं सहन झालं नाही तर एक दिवशी फासावर जाऊन लटकायचं पण होणाऱ्या अन्याया विरुद्ध संघर्ष मात्र करायचा नाही.

आपल्या देशात लोकशाही आहे असं म्हणतात आणि लोकशाहीत लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सरकार नावाची व्यवस्था चालवतात पण हि निवडणूक होत असताना आपण मतदान हे कोणत्या विषयाचा विचार करून करतो आपण पाहतो का कि हा निवडून येणार लोकप्रतिनिधी लोकांच्या कामाचा आहे का ? मतदानावेळी आपण पाहतो पहिली ती जात , धर्म , पक्ष , पंथ , पैसा , समाजातील तथाकथित प्रतिष्ठा , धर्माचा मांडलेला बाजार , जेवणावळी , 2-4 % मंडळी रात्रीची दारूच्या व्यवस्था काही मंडळी तर नेत्यानं किती बायका ठेवल्या आहेत हेही पाहतात म्हणे त्यांच्या मते जो नेता बायका ठेवत नाही तो कसला नेता ? हे सगळ्यातून जो उमेदवार आपल्याला योग्य वाटतो त्याला आपण निवडून देतो आणि नंतर पुढील 5 वर्षें काही उपयोग नाही या सरकारचा म्हणून ठोकत बसतो.

याला अपवाद म्हणून राजू शेट्टी साहेबांच्या सारखा एकादा ध्येयवेडा असतो ते या अन्याया विरुद्ध रस्त्यावर येऊन रान पेटवतात पण पश्चिम महाराष्ट्रात ऊसासाठी जी मंडळी साहेबांच्या एका हाकेवर रस्त्यावर उतरतात व आंदोलनाची तीव्रता वाढवतात आणि आपला हक्क मिळवतात त्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात बाकी शेतीमाला साठी आंदोलन होत नाहीत काही मंडळी असतात जे राजू शेट्टी साहेबांना फोन करतात आणि विचारतात साहेब कांद्याचे दर पडत आहेत आपण काहीतरी केलं पाहिजे इतकं म्हटलं कि यांची जबाबदारी संपली. शेतकरी संघटनेच्या मावळ्यांनीच यासाठी लढा उभा करावा वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करून केसेस अंगावर घ्याव्यात. यातूनही वाईट म्हणजे जे 5-25 रस्त्यावर आंदोलनासाठी येतात त्यांचीच टिंगल टवाळी करणारे आपल्यातीलच काही तथाकथित गावं पुढारी असतात आणि त्यावर हसणारे आपल्यातीलच पारावर बसलेले असतात याची खंत वाटते. आणि बाकी मंडळींनी घरात बसून टीव्ही वर बातम्यातून दिसणारी मज्जा पाहावी बातम्यासुद्धा आंदोलन हिंसक झालं तरच दाखवल्या जातात नाहीतर तुम्ही निवेदन दिली, शांततेत मोर्चे काढले यांच्या बातम्या सहजासहजी येत नाहीत. ते रिपोर्टर तरी काय करणार जो बिकता है तेच दाखवणार ना ? बघा तुम्ही बातम्या बघत असतांना काय बघता ते बातमीत चटपटीतपणा नसेल तर चॅनल बदलता आणि चटपटीत बातमी मन लावून पाहता मग ती मंडळी तेच रक्तरंजित असणारच दाखवणार ना ?

तुम्ही पहा चळवळीतील एखादा अभ्यासू एकाद्या चॅनल वर आपली मत मांडत असेल आणि त्याच वेळी दुसरा एकादा नेता हिंदू-मुस्लिम , देऊळ , मश्चिद , जातपात , हनुमान चालीसा , मुघलांच्या बायका कोण होत्या ? असं काहीतरी बोलणारा असेल तर आपण लगेच या बातम्या पाहायला सुरवात करतो. अगदी तो नेता घरातून सभेच्या ठिकाणी यायला निघाल्या पासून लाईव्ह बातम्या चालू असतात समजा रस्त्यात तो लघुशंकेसाठी कुठंतरी थांबलाच तर त्याचीही चर्चा होते ( म्हणजे ते हितचं का थांबले असतील ? त्यांना काही प्रेशर तर नसेल ना ? का त्यांची शुगर वाढली असेल ? लेगच एकाद्या डॉक्टरला किंवा सायकोलॉगीच्या माणसाला आणून बसवतात आणि आपण ते अगदी तण मन धन अर्पून पाहतो ) पण तो चळवळीतील पोटतिडकीनं बोलणारा एकटाच बसतो बडबडत मग ते कोण दाखवणार ? आणि कोणासाठी आपल्याला आपले प्रश्न कोणते याचा विसर पडला आहे.

आताच्या या परिस्तितीत कधी बदल होणार आहे कि नाही हे काळ ठरवेल पण इतिहास पाहिला तर तो लढणाऱ्यांचा लिहिला जातो पारावर बसून टिंगल टवाळी करणाऱ्या धेंडांचा नाही हे मात्र सत्य आहे अन भविष्यात जेव्हा केव्हां या काळाची चर्चा होईल तेव्हा आपली माती , शेती अन मती साठी एक झुंजार लढवय्या म्हणून राजू शेट्टी साहेब व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आठवली जाणार यात तिळमात्र शंका नाही.
खालील पावतीत शेतकऱ्यानं कष्टानं पिकवलेला ७.४ क्विंटल कांदा विकला व पदरचे २६ रूपये देऊन शेतकरी आला.

Related Stories

आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

राज्यात उष्माघाताचा आणखी एक बळी

datta jadhav

बीडमधील सह्याद्री देवराईला आग; 2 एकरावरील झाडे जळून खाक

datta jadhav

“तुम्ही निवृत्त व्हा नाहीतर मी तुमच्या विरोधात … “

Abhijeet Shinde

‘आशा’ ना मिळाले विमा संरक्षण, जिल्ह्यातील3000 महिलांना दिलासा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!