कौटूंबिक स्नेहसंम्मेलनाचेही आयोजन : 73 अधिकारी व कर्मचाऱयांना केले सन्मानित
कोल्हापूर ः फोटो – केओपीडाटामध्ये डीआयओ फोल्डरमध्ये महावितरण नावाने आहे. -पुरस्कारप्राप्त उपविभागीय अभियंत्यांसोबत महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत.
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर मंडळात महावितरणचा 17 वा वर्धापनदिन सोमवार दि.06 जुन रोजी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कौटुंबिक स्नेहसंम्मेलन व ऊर्जापुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न झाला. इचलकरंजी विभागाने ऊर्जाशिरोमणी पुरस्कार पटकाविला. मुख्य अभियंता परेश भागवत यांचे हस्ते कार्यकारी अभियंता प्रदीपकुमार राठी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाविन्यपुर्ण उपक्रम असलेल्या ऊर्जा पुरस्कारासाठी सन 2021-22 या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीचे मुल्यमापन करण्यात आले. नव्या ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे कर्मचायांना मिळाली आहे.
कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू सांस्कृतिक भवनात वर्धापनदिन सोहळा रंगला. या सोहळ्यास मुख्य अभियंता परेश भागवत, अधिक्षक अभियंता (प्र.) सुनिल शिंदे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अभिजीत सिकनीस, प्रशांतकुमार मासाळ, कार्यकारी अभियंता (ग्राहक मंच) सुधाकर जाधव कार्यकारी अभियंता प्रदीपकुमार राठी, सुनिल माने, विजयकुमार आडके, दिपक पाटील, वैभव गोंदील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी महावितरण अधिकारी-कर्मचाऱयांनी कलागुण सादरीकरण केले. नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. त्यानंतर ऊर्जापुरस्कारांचे वितरण झाले. ऊर्जाभुषण, ऊर्जारत्न व ऊर्जाशिरोमणी या तीन श्रेणीतील पुरस्कारांनी विशेष कामगिरीबद्दल महावितरणच्या तंत्रज्ञ, यंत्रचालक, लेखा, मानव संसाधन व अभियंता संवर्गातील 73 अधिकारी-कर्मचाऱयांना सन्मानित करण्यात आले. वडगाव (उपविभागीय अभियंता-सचिन जगताप) ,पन्हाळा (अमोल माने), कोल्हापूर पूर्व (सचिन पाटील), इचलकरंजी ग्रामीण (सुनिल अकीवाटे), गारगोटी (दिगंबर पोवार), गडहिंग्लज (सागर दांगट) या उपविभागांना ऊर्जारत्न पुरस्कार बहाल करण्यात आला.